शेती मशागत झाली, आता प्रतीक्षा खत, बियाण्यांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:37 AM2021-05-20T04:37:38+5:302021-05-20T04:37:38+5:30
राज्य सरकारने लावलेल्या कडक निर्बंधांमधून कृषी केंद्रांना अंशतः सूट देण्यात आली होती. मात्र, जिल्हाधिकारी यांनी दहा दिवसांच्या जिल्ह्यात ...
राज्य सरकारने लावलेल्या कडक निर्बंधांमधून कृषी केंद्रांना अंशतः सूट देण्यात आली होती. मात्र, जिल्हाधिकारी यांनी दहा दिवसांच्या जिल्ह्यात लावलेल्या निर्बंधांमध्ये ही सूट नाकारली असल्याने सध्या कृषी केंद्र बंद आहेत. या दिवसात शेतकरी खत आणि बियाण्यांचा साठा खरेदी करून ठेवतात.
आम्ही मे महिन्यात खत व बियाणे भरून ठेवत असलो तरी या वर्षी लॉकडाऊन असल्यामुळे बाजारात जाऊ शकलो नाही. लवकर कृषी केंद उघडावे, अशी मागणी पुरुषोत्तम सुभाष उगले यांनी केली आहे.
आम्ही शेतात राहत असल्यामुळे दरवर्षी खत व बियाणे रस्त्याअभावी लवकरच भरत असतो. यावर्षी लॉकडाऊन असल्याने अजूनपर्यंत खत बियाणे खरेदी करता आलेले नाही. पाऊस पडण्यापूर्वी खत आमच्या शेतात असावी लागतात. नंतर शेतात गाड्या जात नाहीत.
अनिरुद्ध सुभाष उगले, रा. ऊगला, ता. सिंदखेड राजा
कोरोना लवकर संपला पाहिजे यासाठी सरकार करीत असलेले प्रयत्न चांगले आहेत; पण आता कोरोनापेक्षा शेतीची चिंता आहे. खत, बियाणे खरेदी केल्याशिवाय पेरा होणार नाही. मे महिन्यात याची खरेदी होते; पण आज ती शक्य नाही. प्रशासनाने लवकर मार्ग काढावा.
रामदास खरात, शेतकरी