निबंध स्पर्धेत एडेडच्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:37 AM2021-02-09T04:37:43+5:302021-02-09T04:37:43+5:30
८ फेब्रुवारी राेजी स्थानिक एडेड हायस्कूल बुलडाणा येथे बक्षीस वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी बुलडाणा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ...
८ फेब्रुवारी राेजी स्थानिक एडेड हायस्कूल बुलडाणा येथे बक्षीस वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी बुलडाणा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे होते, तर प्रमुख पाहुणे सहायक वनसंरक्षक अधिकारी व्ही. जी. साबळे होते, तर अतिथी म्हणून शाळेचे प्राचार्य आर. ओ. पाटील, वनरक्षक आंग्रे, गवई, नेवरे खराडे तसेच पर्यवेक्षिका निकाळजे, परांजपे आदी उपस्थित हाेते.
या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे, प्रमुख पाहुणे व्ही. जी. साबळे, शाळेचे प्राचार्य आर. ओ. पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, मेडल, भेटवस्तू, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेनाप्रमुख आर. एन. जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन भक्ती लव्हाळे हिने केले, तर आभार श्रध्दा लव्हाळे हिने मानले. कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.