खामगावात एमआयएमचे डफडे बजाव आंदोलन
By अनिल गवई | Published: June 28, 2024 08:04 PM2024-06-28T20:04:53+5:302024-06-28T20:05:52+5:30
विविध मागण्यांसाठी एमआयएमच्यावतीने डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: शहर हद्दीतील शेत सर्वे नं. ३८ मधील लेआऊट प्रकरण खारीज करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी एमआयएमच्यावतीने शुक्रवारी डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.
निवेदनानुसार, शहरातील लेआऊट प्रकरणासोबतच विविध समस्यांबाबत एमआयएमच्यावतीने नगर पालिका प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. २४ मे रोजी तक्रार आणि १० जून रोजी स्मरण पत्रही देण्यात आले. मात्र, नगर पालिका प्रशासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्याचवेळी कब्रस्तान कमिटीच्यावतीनेही उपरोक्त ठिकाणी वस्ती झाल्यास पूर्वजांच्या कबरींना धोका पोहोचू शकतो. तसेच घाण पाणी या कबरी पर्यंत येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे यापूर्वीच निवेदनातून स्पष्ट केले आहे.
मात्र, याकडे नगर पालिका प्रशासनाकडून सातत्याने डोळेझाक केली जात असल्याने शुक्रवारी एमआयएमच्यावतीने डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. तसेच यापुढे समस्या न सुटल्यास बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनात मोहमद आरिफ, सईद मिर्ज़ा , अब्दुल इमरान, शेख इमरान , शेख रिजवान , शेख सुभान, शेख यूनुस कुरैशी , नासिर खान , अनवर खान , आमिर खान , जबर खान , शेख रिजवान , जमीर खान , मोहम्मद शफा , सुफियान खान आदी मोठ्यासंख्येने सहभागी होते.