ना.मा.मिरगे पुरस्काराने अजिम नवाज राही सन्मानित
By admin | Published: May 31, 2017 12:29 AM2017-05-31T00:29:18+5:302017-05-31T00:29:18+5:30
बुलडाणा : ना.मा.मिरगे पुरस्काराने सात्विकतेचा आणखी एक परिसस्पर्श झाला, असे विचार ख्यातनाम कवी, निवेदक अजिम नवाज राही यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कवी लिहितो तो समाज जोडण्यासाठी. माणसाला माणसाशी जोडते ती खरी कविता असते, असं मी मानतो. ना.मा.मिरगे पुरस्काराने सात्विकतेचा आणखी एक परिसस्पर्श झाला, असे विचार ख्यातनाम कवी, निवेदक अजिम नवाज राही यांनी व्यक्त केले. माजलगाव येथील शनिवारी स्वा.सै.शाहीर ना.मा.मिरगे प्रतिष्ठाणचा ६ वा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
महात्मा फुले विद्यालयाच्या अनंत भालेराव सभाग्रहात व्यासपीठावर नवविकास मंडळाचे अध्यक्ष अॅड.एस आर. शर्मा, प्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर, शालेय समितीचे अध्यक्ष र.ब.देशमुख, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाट्यलेखक अरुण मिरगे, सचिव श्याम मिरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक अरूण मिरगे यांनी केले. यावर्षीचा पुरस्कार अजिम नवाज राही यांच्या कल्लोळातला एकांत, या काव्यसंग्रहासाठी राही यांना अॅड.एस.आर.शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हृदयाचा ठाव घेणारी राही यांचा काव्यप्रवास नावाप्रमाणेच अनंत काळ चालणाराच असेल, असे प्रतिपादन अॅड. शर्मा यांनी व्यक्त केले. या पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्यिक मोहीब कादरी,अशोक वाडेकर ,भास्कर काळे ,लता जोशी, दैठणकर ,खेलबा काळे ,भारत सोळंके, प्रकाश पत्की, डॉ.प्रज्ञा जोशी, प्रशांत भानप, अंजीराम भोसले, आरेफ शेख, सुरेखा कोकड, प्रतिभा थिगळे, बळीराम वायबसे यांच्यासह अनेक रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अशोक मिरगे यांनी केले तर मानपत्राचे वाचन आणि आभार कवी महेश देशमुख यांनी मानले.