अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा; अखिल भारतीय किसान सभेचे खामगावात उपोषण
By अनिल गवई | Published: October 3, 2022 01:16 PM2022-10-03T13:16:43+5:302022-10-03T13:17:38+5:30
अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा अखिल भारतीय किसान सभेने आंदोलन केले.
खामगाव (बुलडाणा) : तालुक्यातील अंत्रज येथील बंधाऱ्यामुळे ५१ पेक्षा अधिक शेतकऱ्यांना शेत रस्त्याची समस्या उद्भवली असून शिवारातील ५०० एकर जमिन बाधित झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यासोबतच इतर समस्या सोडविण्यासाठी अंत्रज येथील शेतकऱ्यांसोबतच अखिल भारतीय किसान सभा तालुका कमेटी खामगावच्यावतीने उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात करण्यात आली.
अंत्रज येथील बंधाऱ्यामुळे शेत रस्त्यावर तुडुंब पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कसणे कठीण झाले असून, शिवारातील तब्बल ५०० पेक्षा अधिक एकर शेती बाधित झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे वारंवार निवेदन देण्यात आले. वेळोवेळी निवेदन देऊनही समस्या निकाली न निघाल्यामुळे अंत्रज येथील शेतकरी बांधवासोबतच अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात करण्यात आली.
या आंदोलनात कॉ.रामचंद्र भारसाकळे, कॉ. विप्लव कविश्वर, कॉ. प्रकाश पताडे, कॉ. जितेंद्र चोपडे, भुपडा भारसाकळे, बाळकृष्ण खंडारे, सुरेश देशमुख, प्रमोद देशमुख, सोपान शेगोकार, गोपाळ कळमकार, दुर्गादास कळसकार, गजानन बागडे, ज्ञानेश्वर चोरे, संतोष बगाडे, रामदास गायकवाड, सुधाकर देशमुख, वासुदेव महाले, अनिल महाले, राजेश फुंडकर, संजय लाहुडकार, पवन घाटे, रामदास बोचरे आदींचा सहभाग आहे.