जिल्हाभर ‘गण गण गणांत बोते’चा गजर
By admin | Published: February 19, 2017 02:15 AM2017-02-19T02:15:53+5:302017-02-19T02:15:53+5:30
हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद : ‘श्रीं’च्या दर्शनासाठी गर्दी
बुलडाणा, दि. १८- श्रींच्या प्रकट दिनानिमित्त १८ फेब्रुवारी रोजी जिल्हाभर ह्यगण गण गणांत बोतेह्णचा गजर गुंजला. गावागावांत भजन, कीर्तन व भागवताचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
श्रीक्षेत्र येळगाव येथे प्रगटदिनी संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांची एकच गर्दी उसळली. मंदिरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रकट दिन उत्सवाची ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
शनिवारी पहाटे पाच वाजता ह्यश्रींह्णची विधिवत महापूजा करण्यात आली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गजानन विजय ग्रंथ पारायणाची कळस अध्यायाने सांगता झाली. सकाळी १0 वाजता वारकरी महामंडळाचे राज्याध्यक्ष हभप प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाला सुरुवात झाली. बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दुपारी एक वाजेपासून रात्री उशिरापर्यंंत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रींच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून गुरुदेव बहूद्देशीय संस्था, ग्रामपंचायत व डॉक्टर्स मित्र परिवाराच्यावतीने भाविकांसाठी मोफत तपासणी व औषधोपचार शिबिर घेण्यात आले. हृदयरोग, मेंदूरोग, सांधेदुखी, मधूमेह, रक्तदाब, हर्निया, मोतीबिंदू, काचबिंदू व अन्य रोगाची तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. सुनील राजपूत, डॉ. विजय निकाळजे, डॉ. डुकरे, डॉ. खोलाडे, डॉ. कल्याणी राजपूत, डॉ. प्रियंका गायकवाड यांनी सेवा देत ५५0 रुग्णांची तपासणी केली.