अमेरिकेतही विठ्ठल नामाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:23 AM2021-07-21T04:23:46+5:302021-07-21T04:23:46+5:30

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे ...

Alarm of the name Vitthal in America too | अमेरिकेतही विठ्ठल नामाचा गजर

अमेरिकेतही विठ्ठल नामाचा गजर

Next

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकदशीला येथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रात हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु हीच आषाढी एकादशी सातासमुद्रापार अमेरिकेत ही साजरी केली आहे. डोणगांव येथील माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचे बंधू डॉ. प्रशांत सावजी व महाराष्ट्रातील ईतर नागरीक जे अमेरिकेत प्फलोरीडा येथे वास्तव्यास आहेत त्यांनी एकत्र येऊन विठ्ठल रुखमाईच्या मुर्तीला सकाळीच अभिषेक करून भजन व विठ्ठलाचे नामस्मरण केले. यावेळी विविध कार्यक्रम आयोजित करून आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. भारतातील बळीराजाला सुखी ठेव व भारतातुन कोरोना हद्दपार करा अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. यावेळी अमेरिकेत राहणारे महाराष्ट्रीयन एकत्र येऊन त्यांनी विठ्ठलाला साकडे घालीत आषाढी एकादशी साजरी केली.

200721\new doc 2021-07-20 14.11.00_3.jpg

अमेरिकेत आषाढी एकादशी साजरी करताना प्रशांत सावजी व महाराष्ट्रीयन

Web Title: Alarm of the name Vitthal in America too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.