सर्वच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:22+5:302021-06-01T04:26:22+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात गत आठवड्यापासून काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जिल्हा प्रशासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. १ जूनपासून सर्व ...

All necessities shops will be opened | सर्वच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडणार

सर्वच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडणार

Next

बुलडाणा : जिल्ह्यात गत आठवड्यापासून काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जिल्हा प्रशासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. १ जूनपासून सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. माॅल आणि शाॅपिंग काॅम्प्लेक्समध्ये असलेली दुकाने मात्र १५ जूनपर्यंत बंदच राहणार आहेत.

राज्यात काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत आहे. त्यामुळे राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध कायम ठेवले हाेते. तसेच गत आठवड्यातील पाॅझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावर स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याची मुभा दिली हाेती. बुलडाणा जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट सरासरी ७.२३ टक्क्यावर पाेहोचल्याने प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत.

सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने, सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने (अंडी, चिकन, मांस, स्वीट मार्ट) आता साेमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत, तर शनिवार आणि रविवारी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच कृषी सेवा केंद्र आणि कृषी निविष्टांची दुकाने, कृषी प्रक्रिया, उद्याेग गृहे, शेती अवजारे आणि शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने साेमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ३ आणि शनिवार, रविवारी सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या दुकानांवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. बॅंका व आर्थिक व्यवहाराशी संबंधित संस्था सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू राहणार आहेत. बॅंकांनी पीक कर्जाची कामे प्राधान्याने करावीत, तसेच एटीएममध्ये २४ तास राेख ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. शहरातील पेट्रोल पंप सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहेत. मद्य विक्रीची दुकाने बंदच राहणार आहेत. केवळ सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत घरपाेहोच सेवा सुरू राहणार आहे. सर्व वकिलांची कार्यालये, चार्टर्ड अकाैंटंट यांची कार्यालये सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत, तर ऑप्टिकलची दुकाने सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

हे बंदच राहणार...

सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, माेकळ्या जागा, उद्याने, बगीचे पूर्णत: बंद राहतील.

माॅर्निग व इव्हिनिंग वाॅक बंदच राहणार आहे.

केशकर्तनालये, सलून, ब्युटी पार्लर बंदच राहणार आहेत.

शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग बंद राहणार आहेत.

सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हाॅल बंद राहतील.

चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव बंद राहतील.

जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.

हे राहणार सुरू...

सर्व प्रकारची जीवनाश्यक वस्तूंची दुकाने/किराणा/स्वस्त धान्य दुकाने.

भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने.

दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्री डेअरी.

सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने.

कृषी सेवा केंद्र, शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने.

राष्टीयीकृत बॅंका, आर्थिक व्यवहारासंबंधित संस्था.

पाळीव प्राणी खाद्यपदार्थांची दुकाने.

माॅल आणि शाॅपिंग काॅम्प्लेक्समध्ये नसलेली सर्व प्रकारची दुकाने.

कृषी उत्पन्न बाजार समिती.

विवाह साेहळ्यासाठी २५ लाेकांची उपस्थिती.

विवाह साेहळ्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. केवळ २५ लाेकांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असून, दाेन तासांत विवाह पार पाडावा लागणार आहे.

वृत्तपत्र वितरण सुरूच राहणार

सर्व वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण सुरू राहणार आहे. वृत्तपत्रांची घरपाेहोच सेवा नियमित वेळेनुसार करता येणार आहे. तसेच प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्ती / पत्रकार तसेच प्रसारमाध्यमांची कार्यालये, सर्व प्रकारची दैनिके, नियतकालिके तसेच टीव्ही न्यूज चॅनल सुरू राहणार आहेत.

शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांना प्रवेश बंद...

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांसाठी प्रवेश पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. निवेदने अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कार्यालये १०० टक्के, तर इतर सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहणार आहेत.

Web Title: All necessities shops will be opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.