रोजगारविषयक सर्व सेवा आता मिळणार ऑनलाईन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:16 AM2017-10-05T01:16:16+5:302017-10-05T01:16:19+5:30
बुलडाणा : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय यांच्याकडून पुरविण्यात येणार्या रोजगारविषयक सर्व सेवा आता ऑनलाइन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाइन मिळणार असून, त्यासाठी संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

उद्योजक/आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालये कायदा १९५९ अन्वये त्रैमासिक ईआर-१ ची माहिती बंधनकारक असलेली माहिती या संकेत स्थळावर द्यावी लागणार आहे. सप्टेंबर २0१७ अखेर संपणार्या त्रैमासिककरिता माहिती या संकेत स्थळावर त्यांचे युजर आयडी व पासवर्ड लॉगीन करून ऑनलाइन सादर करावयाची आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावयाचे आहे. ऑनलाईन ईआर-१ सादर करण्यात काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा या कार्यालयाशी संपर्क साधावा. ईआर-१ सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २0१७ आहे. यामध्ये कसुरदार आस्थापनांवर विहीत नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, याची नोंद घेण्यात यावी, असे सहायक संचालक चिमणकर यांनी कळविले आहे.