कृतीयुक्त शिक्षणातून सर्वांगीण विकास - मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 07:27 PM2017-09-17T19:27:54+5:302017-09-17T19:28:27+5:30
कृती युक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो. त्याच प्रमाणे अध्यापन प्रक्रिया सुलभ होते, असे मत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायीक संस्थेचेप्राचार्य शिवशंकर मोरे यांनी केले. बुलडाणा तालुक्यातील येळगांव येथील प्रगती अध्यापक विद्यालयात आयोजित दोन दिवसीय विज्ञान शिक्षकाचे प्रशिक्षण कार्यशाळा उद्घाटन ९ सप्टेंबर रोजी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कृती युक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो. त्याच प्रमाणे अध्यापन प्रक्रिया सुलभ होते, असे मत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायीक संस्थेचेप्राचार्य शिवशंकर मोरे यांनी केले. बुलडाणा तालुक्यातील येळगांव येथील प्रगती अध्यापक विद्यालयात आयोजित दोन दिवसीय विज्ञान शिक्षकाचे प्रशिक्षण कार्यशाळा उद्घाटन ९ सप्टेंबर रोजी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी प्राचार्य शिवशंकर मोरे यांनी शासन राबवित असलेल्या वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमाविषयी आणि धोरणाविषयी माहिती दिली. दोन दिवशीय कार्यशाळेस बुलडाणा चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मोताळा या चार तालुक्यातील एकूण १३५ विज्ञान शिक्षक उपस्थित होते. सदर कार्यशाळा प्राचार्य मोरे, जिल्हा समन्वयक गजानन पवार यांच्यासह सुधाकर डहाके, प्रविण क्षिरसागर, अविनाश पाटील, संजय साखरे, गजु धोंडगे, गोमासे, योगेश परिहार, व्ही.जे.घोंडगे, दिपक नागरे, रामदास गुरव, गणेश ओव्हर, गजानन वैराळकर, के.एस.सिरसागर, चिमनपुरे आदींनी मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षण राष्टÑीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत विद्या प्रतिष्ठान पुणे, राज्य विज्ञान संस्था नागपूर, न्यास डोबिवली आणि शिक्षण विभाग बुलडाणा डाएट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते.
या प्रसंगी प्रगती अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य वाघ यांची प्रमुख्याने उपस्थिती होती. १० सप्टेंबरला कार्यशाळेचा समारोप झाला तेव्हा वर्गअध्यापन करतांना विविध छोट्या छोट्या प्रयोगमधून विज्ञान विषयाच्या संकल्पना स्पष्ट करता येतात त्यासाठी कार्यशाळेतील विविध प्रयोगाचा उपयोग करुन देण्याची ग्वाही सर्व सहभागी शिक्षकांनी दिली.