मुख्याध्यापकाविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप
By admin | Published: July 12, 2014 10:16 PM2014-07-12T22:16:47+5:302014-07-12T22:16:47+5:30
साखरखेर्डा येथील उर्दू हायस्कूलमधील मुख्याध्यापक प्रत्येक कामात भ्रष्टाचार करीत असल्याची तक्रार याच शाळेतील लिपीकाने केली आहे.
सिंदखेडराजा : तालुक्यातील साखरखेर्डा येथील उर्दू हायस्कूलमधील मुख्याध्यापक प्रत्येक कामात भ्रष्टाचार करीत असल्याची तक्रार याच शाळेतील लिपीकाने केली आहे.उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक सै.मुस्ताक सै.इसाक यांनी शालेय साहित्य खरेदीत केलेल्या अपहार प्रकरणी संस्थेच्या संचालकांनी वेळोवेळी तक्रारी दिल्या. त्या तक्रारीची दोन वेळा चौकशी झाली. दोन्ही वेळेचा चौकशी अहवाल मोघम देण्यात आल्याने आतापर्यंंत ठोस कारवाई आजपर्यंत झाली नाही. सै.मुस्ताक यांना वाचविण्यासाठी वरिष्ठ अधिकारी मोघम अहवाल देत असल्याने त्याचा त्रास इतरांना सहन करावा लागत आहे. असा आरोप हायस्कूलचे कनिष्ठ लिपीक मो.असलम मो.बशीर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.
** ५२ हजार रुपये दंड
शाळेचे ऑडीट, सिनीअर ऑडीट न करणे, कर्मचार्यांच्या जीवन विम्याचे व इतर कपातीची रक्कम स्वत: वापरल्याने आणि टिडीएस वेळेवर न भरल्याने आयकर विभागाकडून मुख्याध्यापकांना ५२ हजार रुपयांचा दंड झालेला आहे.