विधानसभा निवडणूक : युती, आघाडीच्या नेत्यांसाठी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 06:24 AM2019-07-30T06:24:18+5:302019-07-30T06:24:26+5:30

वंचित फॅक्टरवर अनेकांचे लक्ष : बुलडाणा आणि चिखली विधानसभेतील तिकीट वाटपात लागणार कस

Alliance, Assembly election reputation for top leaders | विधानसभा निवडणूक : युती, आघाडीच्या नेत्यांसाठी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची

विधानसभा निवडणूक : युती, आघाडीच्या नेत्यांसाठी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची

Next

नीलेश जोशी

बुलडाणा : आगामी विधानसभा निवडणुकीत युती व आघाडीच्या जागा वाटपाचा ताळमेळ कसा बसतो यावर जिल्ह्यातील बहुतांश राजकीय समिकरणे अवलंबून राहणार आहेत. मात्र ही निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससाठीही तितकीच प्रतिष्ठेची आहे.
नवे कामगार मंत्री डॉ. संजय कुटे आणि सलग तिसऱ्यांदा खासदार होण्याचा बहुमान मिळवणारे शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांची परीक्षा पाहणारी असणार आहे. आघाडी अंतर्गत जागा वाटपाची चर्चा सुरू झाली असून युती मात्र निश्चित असल्याची स्थिती आहे.

जळगाव जामोदमध्ये कामगार मंत्री डॉ. संजय कुटे, मलकापूरमध्ये भाजपचे जेष्ठ नेते चैनसुख संचेती आणि खामगावमधून अ‍ॅड. आकाश फुंडकर , मेहकर आणि सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात अनुक्रमे शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. संजय रायमुलकर आणि डॉ. शशिकांत खेडेकर हे उमेदवार राहतील, असे दिसते. दुसरीकडे काँग्रेसला बुलडाणा आणि चिखली या आपल्या ताब्यातील दोन्ही जागा कायम ठेवण्यासाठी कसरत करावी लागेल. अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहूल बोंद्रे यांची प्रतिष्ठा त्यामुळे पणाला लागली आहे लोकसभा निवडणुकीत एक लाख ३३ हजार मतांनी पराभव झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे विधानसभा निवडणुकीत पुन्हा सिंदखेड राजा येथून भाग्य आजमावणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत एकीकडे आघाडीला ‘वंचित’मुळे मोठा फटका बसलेला असतानाच युतीचे मताधिक्यही चार टक्क्यांनी कमी झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रसंगी तिरंगी
लढत होण्याची शक्यता नाकारता
येत नाही. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीत
कोणती जागा मागते, हा कळीचा
मुद्दा आहे.
काँग्रेसने मलकापूरची जागा ही मुस्लीम समाजासाठी सोडावी, असा सूर निघत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्थानिक पातळीवर मलकापूर विधानसभेची जागा त्यांंना मिळावी, असा प्रयत्न चालविला आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली मेहकर विधानसभेची जागा काँग्रेसने मागितली आहे युती झाल्यास बुलडाणा आणि चिखली मतदारसंघात खºया अर्थाने चुरस राहणार आहे.
बुलडाणा पारंपरिक शिवसेनेचा तर चिखली भाजपकडे आहे. मात्र शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यातील शहकाटशहचे राजकारण सर्वश्रूत आहे. त्यामुळे येथे विधानसभेच्या तिकिटासाठी मोठी स्पर्धा आहे. अशीच स्थिती चिखलीमध्ये भाजपची आहे.
भाजपमध्ये माजी आमदार रेखाताई खेडकर यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाल्याने स्पर्धा आणखी वाढली आहे.

२०१४मधील निवडणुकीत सर्वांत मोठा विजय :
मेहकर : डॉ. संजय रायमुलकर (शिवसेना)। मते : ८०,८८१,
फरक ३६,३४८
सर्वांत कमी मताधिक्याने पराभव : जळगाव जामोद : प्रसेनजीत पाटील (भारिप) - ४,६९५ ( विजयी - डॉ. संजय कुटे, भाजप, मते-६३,८८८).

एकूण जागा : ७ । सध्याचे बलाबल : भाजप - ३, शिवसेना - २, कॉँग्रेस-२


 

Web Title: Alliance, Assembly election reputation for top leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.