एक हजार झाडांचे केले वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:33 AM2021-07-29T04:33:47+5:302021-07-29T04:33:47+5:30
जानेफळ : काळाची गरज ओळखून वृक्षलागवडीचा संदेश देत येथील माजी सरपंच डॉ. सतीश कुळकर्णी यांनी २४ जुलै रोजी विविध ...
जानेफळ : काळाची गरज ओळखून वृक्षलागवडीचा संदेश देत येथील माजी सरपंच डॉ. सतीश कुळकर्णी यांनी २४ जुलै रोजी विविध जातींच्या १ हजार झाडांचे वाटप केले आहे. यामुळे त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गावात वृक्षलागवडीची चळवळ निर्माण व्हावी या उद्देशाने पर्यावरणप्रेमी डॉ. सतीश कुळकर्णी यांनी शनिवार, दिनांक २४ जुलै २०२१ रोजी एक कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश कुळकर्णी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मेहकर शहराचे माजी नगराध्यक्ष अशोक अडेलकर, रयत क्रांती संघटनेचे ॲड. जितू अडेलकर, ग्रा.पं. सदस्य सय्यद महेबूब, विक्रम मेहुणकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी शैलेश कुळकर्णी, भानुदास सराफ, गजानन क्षीरसागर, सुभाष वाळके, राम शेळके, गणेश सवडतकर, सचिन राजूरकर, विशाल फितवे, संतोष बोरबळे, परशराम डोंगरे, सचिन वाळके, अरुण लाहोटी, विजय केदारे, राजू केदारे, श्याम सदावर्ते, ज्ञानेश्वर शेवाळे, अमोल सुरजुसे, दीपक इंगळे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
वृक्षलागवडीची चळवळ हवी
यावेळी गावात वृक्षलागवडीची चळवळ निर्माण करण्याची गरज, तसेच वृक्षलागवडीचे फायदे व वाढत्या वृक्षतोडीमुळे होत असलेले दुष्परिणाम याबाबत मान्यवर उपस्थितांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडून त्यानंतर ट्रॅक्टरमधून गावात वड, पिंपळ, निम, चिंच इत्यादी झाडांचे वाटप करण्यात आले.