जिल्ह्याला १५०० कोटींचे उदिष्ट, ७ टक्के पीककर्ज वाटप; खरीप हंगामाची तयारी सुरू
By विवेक चांदुरकर | Published: April 30, 2024 05:37 PM2024-04-30T17:37:45+5:302024-04-30T17:40:23+5:30
आतापर्यंत ७ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले.
विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : खरीप हंगामामध्ये पेरणी करण्याकरिता बॅंकांच्यावतीने शेतकर्यांना पीककर्ज देण्यात येते. यावर्षी जिल्ह्याकरिता १५०० कोटींचे उदिष्ट असून, आतापर्यंत ७ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले.
शेतकर्यांना बॅंकांच्या वतीने एका वर्षाकरिता बिनव्याजी पीककर्ज देण्यात येते. दरवर्षी शेतकरी जुने कर्ज भरून नवीन कर्ज घेतात. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान आटोपले असून शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. शेतातील मशागत सुरू आहे. तसेच पीककर्ज घेण्याकरिता बॅकांमध्ये गर्दी करीत आहे.
जिल्ह्यात १ लाख ५३ हजार ५०० खातेदार शेतकरी आहेत. या शेतकर्यांना कर्जवाटप करण्याकरिता १५०० कोटी रूपयांचे उदिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ९ हजार ४९८ शेतकर्यांना १०२ कोटी ३२ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. यावर्षी लोकसभा निवडणूक असल्यामुळे पीककर्ज वाटपाचे प्रमाण घटले आहे. शेतकरी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत असल्यामुळे पीककर्ज घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत १० ते १२ टक्के पीककर्जाचे वाटप करण्यात येते. जिल्ह्यात सर्वात जास्त उदिष्ट स्टेट बॅंेकला देण्यात आले आहे. स्टेट बॅंकेत ५२ हजार शेतकरी खातेदार असून ४९० कोटी रूपयांचे उदिष्ट देण्यात आले आहे. या बॅंकेच्या वतीने २३ एप्रिलपर्यंत २३७९ शेतकर्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्याला यावर्षी १५०० कोटी रूपयांचे पीककर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आले आहे. २३ एप्रिलपर्यंत ७ टक्के शेतकर्यांना पीककर्जवाटप करण्यात आले आहे.
- नरेश हेडाऊ, व्यवस`थापक, लिड बॅंक, बुलढाणा
गतवर्षी १२५९ कोटींचे पीककर्ज वाटप
जिल्ह्यात गतवर्षी १ लाख २१ हजार ५०७ शेतकर्यांना १२५९ कोटी १९ लाख रूपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते.
बॅकेचे नाव शेतकरी संख्या (टक्के) पीककर्ज वाटप (टक्के)
अलाहाबाद बॅंक ० ०
बॅंक आॅफ बरोडा २ ४
बॅंक आॅफ इंडिया ५ ५
बॅंक आॅफ महाराष्ट्र ४ ४
कॅनरा बॅंक ३ ४
सेंट्रल बॅंक आॅफ इंडिया ५ ५
पंजाब नॅशनल बॅंक ६ ७
स्टेट बॅंक आॅफ इंडिया ५ ५
यूनीयन बॅंक आॅफ इंडिया ४ ७
अॅक्सीस बॅंक ० ०
एचडीएफसी बॅक १४ ७
आयडीबीआय बॅंक २ २
आयसीसीआय बॅंक २ १
बुलढाणा जिल्हा केंद्रिय सहकारी बॅंक १६ ३१