ऑटोरिक्षा चालकांवर पर्यायी रोजगाराची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:35 AM2021-02-16T04:35:06+5:302021-02-16T04:35:06+5:30

बुलडाणा जिल्ह्यात रोजगाराची समस्या गंभीर आहे. उद्योगांची वाणवा असल्याने ५० टक्क्यांहून अधिक कामगारांना शेतीकामाचा आधार घ्यावा लागतो, तर हजारो ...

Alternative employment time on autorickshaw drivers | ऑटोरिक्षा चालकांवर पर्यायी रोजगाराची वेळ

ऑटोरिक्षा चालकांवर पर्यायी रोजगाराची वेळ

Next

बुलडाणा जिल्ह्यात रोजगाराची समस्या गंभीर आहे. उद्योगांची वाणवा असल्याने ५० टक्क्यांहून अधिक कामगारांना शेतीकामाचा आधार घ्यावा लागतो, तर हजारो लोक ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. दिवसभर बसस्थानक, शहरांतील मुख्य चौकात प्रवाशांची वाट पाहणे किंवा ग्रामीण भागांत नियमानुसार प्रवासी वाहतूक करण्यासाठी ऑटोरिक्षा चालकांची मोठी धडपड होत असल्याचे चित्र दर दिवशी पाहायला मिळते. त्यात कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊन काळात ऑटोरिक्षा चालकांचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. आता तो सुरळीत होण्यापूर्वीच शासनाकडून पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ केली जात आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना पूर्वीच्या दरात प्रवाशांची वाहतूक करणेच परवडणारे राहिले नाही. जिल्ह्यात ऑटोरिक्षांची संख्या १५ हजार झाल्याने प्रवासी मिळणे कठीण होते. त्यामुळे या रिक्षा चालकांना आता ऑटोरिक्षा चालविणेच कठीण झाले आहे. दिवसभर ऑटो फिरवून २०० रुपयेसुद्धा कमाई होत नसल्याने अनेकांनी पर्यायी रोजगार शोधले आहेत. त्यात काहींनी भाजीपाला विक्रीचा व्यवसायही सुरू केला आहे.

दरवाढीमुळे व्यवसाय कठीण

बसस्थानकाहून जवळपास एक, दोन किलोमीटरच्या अंतरासाठी प्रतिप्रवासी ३० रुपये भाडे ऑटोरिक्षा चालक घेतात. अशीच स्थिती जिल्हाभरात आहे. तथापि, एवढ्या अंतरात दोन प्रवासी घेऊन गेल्यानंतर परत प्रवासी मिळणे कठीण होते.

दिवसभरात २०० रुपये कमाई

पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने ऑटोरिक्षा चालकांना परवडणारे राहिले नाही. पूर्वी दिवसभर ऑटो चालविल्यानंतर त्यांना ४०० रुपयांपर्यंत कमाई होत असे; परंतु आता मात्र २०० रुपये कमाई होणेही कठीण आहे.

पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. प्रवासी भाडे मात्र पूर्वी एवढेच आहे. त्यामुळे हा व्यवसाय परवडणारा राहिला नाही. दोन किलोमीटर अंतरासाठी प्रत्येकी १० रुपयेप्रमाणे २ प्रवासी घेऊन गेल्यानंतर रिकामे परत यावे लागते, तर ऑटोरिक्षांची संख्या अधिक असल्याने दुसरी फेरी मारण्यासाठी प्रवासीही मिळत नाहीत.

-अमोल गरड, रिक्षाचालक.

मी ॲटोरिक्षा सोडून मंडपचा व्यवसाय सुरू केला आहे. पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली. रिक्षांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रिक्षा चालविणे कठीण झाले आहे. भाड्यात वाढ केली, तर प्रवासी मिळत नाहीत. हे परवडणारे राहिले नाही. त्यामुळे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑटोरिक्षा चालवून इतर कामे करावी लागत आहेत.

- हनुमंत देशमुख, रिक्षाचालक,

गेल्या महिनाभरात डिझेलचे दर ८२ रुपयांवर पोहोचले. प्रवासी भाड्यात मात्र काहीच वाढ झाली नाही. दिवसभर प्रतीक्षा करून दहा फेऱ्यांसाठीही प्रवासी मिळणे कठीण आहे. त्यामुळे सकाळी ११ नंतर ऑटोरिक्षा चालवितो, तर त्यापूर्वी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी इतर व्यवसाय करतो. पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत असल्याने आता हा व्यवसाय परवडणारा राहिला नाही.

-विठ्ठल सरकटे, रिक्षाचालक

Web Title: Alternative employment time on autorickshaw drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.