राज्यातील आठ लाखावर शीधापत्रिकांबाबत संदिग्धता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 03:34 PM2021-01-28T15:34:33+5:302021-01-28T15:34:38+5:30

Ration cards News क्षेत्रिय स्तरावर तपासणी होईपर्यंत या शीधा पत्रिका धान्य उचलण्यासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे.

Ambiguity over ration cards over eight lakh in the state! | राज्यातील आठ लाखावर शीधापत्रिकांबाबत संदिग्धता!

राज्यातील आठ लाखावर शीधापत्रिकांबाबत संदिग्धता!

Next

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून धान्याची उचल न करणाºया तब्बल ७.९० शीधापत्रिका शीधापत्रिका शासनाच्या रडारवर सापडल्या आहेत. क्षेत्रिय स्तरावर तपासणी होईपर्यंत या शीधा पत्रिका धान्य उचलण्यासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे शीधापत्रिका धारकांमध्ये  खळबळ उडाली आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पातंर्गत राज्यात (एईपीओएस) प्रणालीतंर्गत संगणकीकृत केलेल्या शीधापत्रिकेवरील लाभार्थ्यांनी आॅगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० या पाच महिन्यांच्या कालावधीत धान्याची उचल केलेली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील सात लक्ष ९५ हजार १६८  शीधा पत्रिकांची क्षेत्रीय स्तरावर तपासणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या तपासणी अंती या शीधापत्रिकाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.

 
अपात्र, बोगस, अनिच्छुकचा बसणार शिक्का!
्रपाच महिन्यांपासून धान्याची उचल न करणाºया शीधापत्रिकांची क्षेत्रीय स्तरावर तपासणी केली जाणार आहे. यासाठी राज्यातील ७.९० लक्ष शीधापत्रिका संबंधित शीधावाटप निरिक्षकांच्या लॉगीनमध्ये वळत्या केल्या जातील. त्यानंतर अपात्र, बोगस, अनिच्छुक अशी शीधापत्रिकांची वर्गवारी केली जाईल.

 
 

Web Title: Ambiguity over ration cards over eight lakh in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.