सुलतानपूर प्राथमिक आराेग्य केंद्राला मिळाल्या रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:35+5:302021-06-10T04:23:35+5:30

मागील काही महिन्यांपासून काेराेनाचा प्रकाेप ग्रामीण भागातही सुरू हाेता़. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णाला ...

Ambulances received by Sultanpur Primary Health Center | सुलतानपूर प्राथमिक आराेग्य केंद्राला मिळाल्या रुग्णवाहिका

सुलतानपूर प्राथमिक आराेग्य केंद्राला मिळाल्या रुग्णवाहिका

Next

मागील काही महिन्यांपासून काेराेनाचा प्रकाेप ग्रामीण भागातही सुरू हाेता़. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या दयनीय अवस्थेमुळे रुग्ण वेळेत पुढील उपचारासाठी पोहोचेल की नाही, याची शाश्वती नव्हती़. रुग्णवाहिका अत्यंत जीर्ण झाली होती़. सुलतानपूर येथून गेलेले दोन राज्य महामार्ग तसेच सुलतानपूर केंद्रांतर्गत ६ उपकेंद्रे व १९ गावे असल्याने अत्याधुनिक रुग्णवाहिका असणे गरजेचे हाेते. त्यासाठी ग्रामस्थांसह पत्रकारांनी मागणी लावून धरली हाेती. अखेर सुलतानपूर येथील प्राथमिक आराेग्य केंद्राला दाेन रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते दोन्ही रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव वाघ, पंचायत समिती उपसभापती डॉ. हेमराज लाहोटी, शिव पाटील तेजकर, माजी सरपंच सलीमखा पठाण, विजय खोलगडे, गटविकास अधिकारी तांबे, तालुका आरोग्य अधिकारी किसन राठोड, महिला व बाल प्रकल्प अधिकारी आश्विनी सोनी, वै. अ. प्रल्हाद जायभाये, डॉ. कंकाळ, डॉ. जैन, डॉ. संत्रे, डॉ. कुकडे, डॉ. तनपुरे डॉ. बाजड, डॉ. मनोहर चंद्रशेखर आदी उपस्थित होते.

Web Title: Ambulances received by Sultanpur Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.