अमडापूर : विहिरीत आढळला पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 08:16 PM2018-02-17T20:16:50+5:302018-02-17T20:22:56+5:30

अमडापूर (बुलडाणा): उत्रादा शिवारातील विहिरीत एका पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान ही घटना उघडकीस आली.

Amedapur: The body of a fifty-year-old woman found in the well | अमडापूर : विहिरीत आढळला पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह

अमडापूर : विहिरीत आढळला पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह

googlenewsNext
ठळक मुद्देउत्तरादा शिवारातील घटना; आकस्मिक मृत्यूची नोंद मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर (बुलडाणा): उत्रादा शिवारातील विहिरीत एका पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान ही घटना उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, माजी पोलिस पाटील भगवान इंगळे त्यांच्या शेतात हरभरा काढण्यासाठी मजूर घेऊन गेले होते. दुपारी त्यांना विहिरीत महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला. याबाबत त्यांनी तत्काळ अमडापूर पोलिस स्टेशनला माहिती दिली.  ठाणेदार विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ राजेश गवई, नीलेश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत महिलेची ओळख पटली असून हापीजा बी. शेख तस्लिम असे तिचे नाव असून ती पेठ येथील रहिवासी होती. मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Amedapur: The body of a fifty-year-old woman found in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.