आमना नदीची जलपातळी वाढली!

By admin | Published: July 2, 2016 12:57 AM2016-07-02T00:57:52+5:302016-07-02T00:57:52+5:30

देऊळगाव शहरात लोकसहभागातून जलयुक्त शिवारचे यश.

Amena river water level increased! | आमना नदीची जलपातळी वाढली!

आमना नदीची जलपातळी वाढली!

Next

देऊळगाव राजा(जि. बुलडाणा) : महाराष्ट्रातील प्रत्येक गाव सन २0२0 पर्यंंत पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी शासनाने यावर्षीपासून महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. पण, देऊळगाव राजा शहराच्या मध्य भागातून वाहणारी आमना नदीचे अस्तित्व धोक्यात आले होते. मातृतीर्थाचे आमदार डॉ. शशीकांत खेडेकर, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, नगराध्यक्ष मालती कायंदे, सेवानवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे यांच्या पुढाकाराने आणि लोकसहभागातून आमना नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करून शहरात जलक्रांती आणली. अत्यल्प पावसानंतर आमना नदी पाणीदार झाली. त्यामुळे शहरवासीयांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार आहे. तालुक्यातील जल शिवार योजनेमधून झालेले तळे आणि बंधारे पाणीदार झाले. महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार पॅटर्नसारखे शहरातील आमना नदीचा खोलीकरण व रुंदीकरणाच्या लोकसहभागातून कामाची सुरुवात केली. दोन महिन्यानंतर आमना नदीला पुन्हा नदीचे स्वरूप मिळाले. सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष मालती कायंदे, सेवानवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे यांच्या प्रयत्नाने लोकसहभागातून नदीचे खोलीकरण व रुदीकरण करण्यात आले. आज पूर्ण एका वर्षानंतर आमना नदी तुडुंब भरून ओसंडून वाहते. त्यामुळे त्यात जलसाठा लाखो लिटर झाल्याने शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार असून, आमना नदी परिसराचे दोन किलोमीटर हद्दीतील येणारे पाण्याचे स्रोत वाढले असून, शहरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. लवकरच आमना नदीचे सौंदर्यीकरण करून एक अनोखी भेट नगरपालिकेच्यावतीने मिळणार आहे. या अभिनव उपक्रमाने आमना नदी किनार्‍यावर असलेल्या शेतात पिकांना लाभ होणार आहे. नदीचे खोलीकरण १0 फूट, तर रुंदीकरण ६५ मीटर करण्यात आले. त्या पात्रात १0 ते १५ लिटर कोटी पाण्याची साठवण होणार आहे. अत्यल्प पावसाने आमना नदीत लाखो लिटर पाणी साठलेले आहे. या नदीतील गाळ १0 किलोमीटर अंतरावरील शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील उत्पन्न वाढविण्याकरिता उपयोगात आणला. या साठवलेल्या पाण्यामुळे शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Amena river water level increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.