गणपती विसर्जनासाठी गेलेल्या आमले बंधूचा मन नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 07:43 PM2020-09-01T19:43:42+5:302020-09-01T19:43:48+5:30
नदी घाट हा बाळापूर पो स्टे हद्दीत येत असल्याने पुढील तपास उरळ ता. बाळापूर पोलीस करीत आहेत. नागझरी येथील भोई समाज बांधवांनी मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले.
शेगाव : गणपती विसर्जन करण्यासाठी आलेल्या बाळापूर नाका अकोला येथील आमले बंधूंचा नागझरीच्या मन नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना मंगळवारी दुपारी घडली.
गणरायाचे विसर्जन करण्यासाठी बाळापूर नाका अकोला येथील कल्पेश संजय आमले वय 26 व रूपेश संजय आमले वय 25 हे दोघे घरच्या गणपतीचे विसर्जनासाठी मन नदी वर आले. अचानक दोघेही बुडाल्याने एकच खळबळ उडाली. नदी वर असलेल्या अन्य गणेश भक्तांच्या लक्षात येताच धावाधाव झाली.प्रथम रूपेश ला नदी पात्रातून गणेश भक्तांनी पाण्याबाहेर काढले.श्वासोश्वास चालू व्हावा पंपिंग करून पाहिले.मात्र काही उपयोग झाला नाही. अखेर रूपेशची प्राणज्योत मालवली.त्यानंतर कल्पेशची शोधाशोध सुरू केली.सायंकाळी 6 वाजेदरम्यान कल्पेशचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश मिळाले. घटनास्थळी उरळ ता.बाळापूर तसेच शेगाव शहर पोलीस स्टेशन चे अधिकारी नितिन इंगोले व स्टाफ हजर होते. पंचनामा करून शवविच्छेदन साठी मृतदेह पाठविण्यात आले. सदर नदी घाट हा बाळापूर पो स्टे हद्दीत येत असल्याने पुढील तपास उरळ ता. बाळापूर पोलीस करीत आहेत.
नागझरी येथील भोई समाज बांधवांनी मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले.