शाळेच्या जवळच बारुदचे गोडाऊन

By ram.deshpande | Published: July 25, 2017 07:27 PM2017-07-25T19:27:45+5:302017-07-25T19:38:48+5:30

खामगाव : तालुक्यातील लांजूड येथे शाळेच्या जवळच बारुदचे गोडाऊन बांधण्यात आलेले आहे. हे गोडाऊन हटविण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेवूनही उपयोग न झाल्याने गावकºयांनी आता एसडीओंकडे धाव घेतली आहे.

Ammunition Godown near the school at khamgaon | शाळेच्या जवळच बारुदचे गोडाऊन

शाळेच्या जवळच बारुदचे गोडाऊन

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या जीवितास धोका - मुख्याध्यापकगोडाऊन हटविण्यासाठी ग्रामपंचायतने घेतला होता ठरावगावकर्‍यांनी घेतली ‘एसडीओं’कडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील लांजूड येथे शाळेच्या जवळच बारुदचे गोडाऊन बांधण्यात आलेले आहे. हे गोडाऊन हटविण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेवूनही उपयोग न झाल्याने गावकºयांनी आता एसडीओंकडे धाव घेतली आहे. सदर गोडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका असल्याचे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुध्दा दिलेले आहे. त्यामुळे बारुदसारख्या विस्फोटकांचे हे गोडाऊन त्वरित हटविणे गरजेचे बनले आहे.
याबाबत उपविभागीय अधिकारी यांना लांजूड येथील रहिवाशांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, येथील गट नं.१२४ मध्ये रतनलाल पंकजलाल तोष्णीवाल यांच्या मालकीचे गोडाऊन असून त्याची सात-बारामध्ये तलाठी यांनी नोंद केलेली नाही. याअगोदरच्या ग्रामपंचायतच्या कार्यकारिणीने सदर गोडाऊनकरिता ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. परंतु ग्रामस्थांना विश्वासात न घेता मासिक सभेतील ठरावाद्वारे सदर प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच ग्रामपंचायतने ना हरकत प्रमाणपत्र हे शांतीलाल शर्मा यांना दिले होेते. मात्र शर्मा यांनी ते परस्पर रतनलाल तोष्णीवाल यांना विकले. सदर गोडाऊनमध्ये बारुद या विस्फोटकाची साठवणूक मोठ्या प्रमाणात करण्यात येते. परंतु या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा, पाण्याची व्यवस्था, चौकीदार किंवा साधी वालकंपाऊंड सुध्दा नाही. सदर गोडाऊनपासून थोड्या अंतरावरच महाराष्ट्र विद्यालय नामक शाळा आहे. तसेच आजूबाजूला शेतकरी, शेतमजूर वर्ग काम करित असतो. त्यामुळे एखाद्यावेळी काही अपघात घडल्यास विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होवू शकतो. तसेच गोडाऊनजवळूनच जिगाव प्रकल्पाची मोठी पाईपलाईन गेलेली आहे. याअगोदर एकवेळा स्फोट झाला असता त्यामध्ये महिला व लहान मुलांसह काही जण होरपळले होते. परंतु गोडाऊनमालकाने त्यांना उपचारासाठी कोणतीही मदत केली नाही. तरी सदर गोडाऊन कायमस्वरुपी बंद करण्यात यावे अशी विनंती गावकºयांनी केली आहे. विशेष म्हणजे याअगोदर १ मे २०१७ रोजी लांजूड ग्रामपंचायतने सदर गोडाऊन बंद करण्याबाबत ग्रामसभेत ठराव घेवून त्याद्वारे संबंधितांकडे मागणी केली होती. परंतु काहीएक उपयोग झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा एसडीओ व तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. सदर निवेदनवजा तक्रारीवर रविंद्र थेरोकार, गजानन तायडे, गजानन कोटवार, ज्ञानराव थेरोकार, बाळकृष्ण आखरे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Ammunition Godown near the school at khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.