पीक विम्याची रक्कम शेतक-यांना द्यावी!
By admin | Published: July 1, 2016 12:28 AM2016-07-01T00:28:26+5:302016-07-01T00:28:26+5:30
राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाचे जिल्हाप्रशासनास निवेदन.
बुलडाणा : जिल्हय़ातील शेतकर्यांना सरसकट २५ हजार रुपये पीक विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी उपाध्यक्ष नरेश शेळके आदींनी केली आहे. याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकार्यांना २९ जून रोजी निवेदन दिले. निवेदनात नमूद आहे की, मागील वर्षी जिल्हय़ातील शेतकर्यांनी मोठय़ा प्रमाणात पीक विमे काढले होते. दुष्काळी परिस्थितीत पीक विम्याच्या आधार होईल, या आशेवर शेतकरी असताना प्रत्यक्षात मात्र पीक विमा कंपनीकडून शेतकर्यांची फसवणूक झाली आहे. ज्या महसूल विभागामध्ये सोयाबीनचा पेरा मोठा प्रमाणात आहे, अशा ठिकाणी सोयाबीन पिकासाठी पीक विम्याची हेक्टरी २८00 हजार रुपयेपर्यंंत अशा तुटपुंजी रक्कम जाहीर झाली. ज्या भागामध्ये सोयाबीनचा पेरा होत नाही अशा ठिकाणी मात्र हेक्टरी १६ हजार रुपयेपर्यंत पीक विम्याची मदत जाहीर झाली आहे. कपाशीचा पेरादेखील मोठय़ा प्रमाणात असून, कपाशीला काही महसूल विभागामध्ये हेक्टरी ५२९ रुपयेपर्यंंत पीक विम्याची रक्कम जाहीर झाली आहे, तरी शेतकर्यांना सरसकट किमान २५ हजार रुपये हेक्टरी पीक विम्याची रक्कम कंपनीकडून मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकर्यांच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करीत आहोत. याबाबत आम्हाला न्याय न मिळाल्यास भविष्यात शेतकर्यांच्यावतीने तीव्र आंदोलन हाती घेऊ, असा इशाराही नरेश शेळके, शिवाजी पडोळ, अनिल कोळसे, सुनील सोनुने, सुरेश जाधव, भगवान शेळके, संतोष पाटील आदींनी दिला आहे.