अमरावती विद्यापीठाने घेतली राहींच्या सूत्रसंचालनाची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2017 02:02 PM2017-06-28T14:02:45+5:302017-06-28T14:02:45+5:30

दोन सत्रामध्ये अजीम नवाज राही यांनीसूत्रसंचालनाच्या क्षेत्रातील पंचवीसवर्षीय अनुभावाची शिदोरी उपस्थितराज्यभरातल्या प्राध्यापक श्रोत्यांसमोर उकलली.

Amravati University took over the formulation of the formula | अमरावती विद्यापीठाने घेतली राहींच्या सूत्रसंचालनाची दखल

अमरावती विद्यापीठाने घेतली राहींच्या सूत्रसंचालनाची दखल

googlenewsNext

साखरखेर्डा : बहारदार सूत्रसंचालन अन् अमोघ वक्तृत्वाच्या ताकदीवर
संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या श्रवणीय वाणीचा झेंडा फडकवणारे प्रख्यात
मराठी कवी, नामवंत निवेदन अजीम नवाज राही यांच्या सूत्रसंचालनाची दखल संत
गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आपल्या रिफ्रेशर कोर्समध्ये घेतली.
२० जून ते १० जुलै २०१७ या कालावधीत सध्या अमरावती विद्यापीठात १९९० नंतर
चे मराठी साहित्य आणि उपयोजन या विषयांतर्गत रिफ्रेशर कोर्स सुरु आहे. या
कोर्समध्ये संपूर्ण राज्यातले तज्ज्ञ प्राध्यापक सहभागी झाले आहेत. रोज
वेगवेगळ्या क्षेत्रातील मातब्बर मंडळीचे व्याख्यान विद्यापीठातर्फे
आयोजित केले जातात. २४ जून रोजी महाराष्ट्र राज्याच्या सुत्रसंचालनाच्या
क्षेत्रात आपल्या आगळ्यावेगळ्या श्रवणीय तद्वत प्रयोगशील सूत्रसंचालनाचा
अमीट ठसा उमटविणारे प्रख्यात मराठी कवी, नामवंत निवेदक अजीम नवाज राही
यांना ह्यसूत्रसंचालन कसे करावेह्ण या विषयावर व्याख्यान देण्यासाठी
विद्यापीठाने आमंत्रीत केले. दोन सत्रामध्ये अजीम नवाज राही यांनी
सूत्रसंचालनाच्या क्षेत्रातील पंचवीसवर्षीय अनुभावाची शिदोरी उपस्थित
राज्यभरातल्या प्राध्यापक श्रोत्यांसमोर उकलली. प्रास्ताविकपर मनोगताच्या
माध्यमातून प्रा.डॉ.मोना चिमोटे यांनी अजीम नवाज राही यांच्या
हृदयस्पर्शी सूत्रसंचलनाचा धांडोळा घेतला. प्रा.डॉ.मोना चिमोटे म्हणाल्या
बुलडाणा जिल्ह्यातल्या साखरखेर्डा सारख्या आडवळणी गावाला अजीम नवाज राही
यांच्या लेखणीने विशेषता वाणीने प्रसिद्धीचे, मानसन्मानाचे, प्रतिष्ठेचे
वलय बहाल केले. साखरखेर्ड्यासारख्या वितभर गावात अजीम नवाज राही यांनी
सूत्रसंचालन या कलेची केलेली साधना आता उभ्या महाराष्ट्रात श्रवण
सौख्याचे मळे फुलवत आहे. प्रा. डॉ. मोना चिमोटे यांच्या प्रस्ताविकाला
टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देऊन उपस्थित राज्यभरातल्या प्राध्यापकांनी
अजीम नवाज राही यांच्या सूत्रसंचालनाला मानाचा मुजरा केला.

Web Title: Amravati University took over the formulation of the formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.