वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून ऐवज लांबविला

By संदीप वानखेडे | Published: July 17, 2024 03:08 PM2024-07-17T15:08:04+5:302024-07-17T15:11:33+5:30

वसंतनगर शेतशिवारातील घटना : चाेरट्यांविरुद्ध गुन्हा

An old couple was beaten up and delayed | वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून ऐवज लांबविला

वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून ऐवज लांबविला

अंढेरा : शेतात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून साेने-चांदीचे दागिने दाेन चाेरट्यांनी लंपास केलाे ही घटना १६ जुलैच्या रात्री आंचरवाडीजवळील वसंतनगर शिवारात घडली़

वसंतनगर येथील रहिवासी असलेले वृध्द दाम्पत्य विष्णू फुलसिंग राठोड व पत्नी जिजाबाई विष्णू राठोड हे दोघे शेतातील टिनशेडमध्ये राहतात. १६ जुलैच्या रात्री जेवण आटोपून हे वृध्द दाम्पत्य लाकडी बाजेवर झोपले असताना रात्री १० वाजेच्या सुमारास दाेन चाेरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला़ चाेरट्यांनी लोखंडी रॉडने विष्णू फुलसिंग राठोड यांच्या पायावर, पाठीवर जबर मारहाण केली़ तसेच जिजाबाई राठाेड यांना लोखंडी रॉडचा धाक दाखवत गळ्यातील दोन मंगलसूत्र, कानातील सोन्याची फुले, गळ्यातील सोन्याची बारीक मणी पोत, हातातील चांदीच्या पाटल्या असा एकूण एक लाख रुपयांचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील आणि गोरख राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ठाणेदार विकास पाटील यांनी चोरटे ज्या दिशेने पळाले त्या दिशेने जाफराबादपर्यंत रात्रीच शोध घेतला. परंतु, चाेरटे हाती लागले नाही. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अशाेक लांडे यांनी रात्रीच घटनास्थळाला भेट दिली़ तसेच देऊळगाव राजा उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांनी बुधवारी घटनास्थळ गाठून माहिती घेतली. याप्रकरणी जिजाबाई विष्णू राठोड यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६),३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंढेरा पाेलिस करीत आहेत़

मारहाणीत राठाेड गंभीर जखमी
चाेरट्यांनी केलेल्या मारहाणीत विष्णू फुलसिंग राठोड हे गंभीर जखमी झाले आहे़त त्यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाले असून, त्यांना रात्री त्यांचा मुलगा भगवान विष्णू राठोड याने खासगी रुग्णवाहिकेतून चिखली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

Web Title: An old couple was beaten up and delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.