अन् पूर्णामाय वाहायला लागली!

By Admin | Published: June 17, 2017 12:12 AM2017-06-17T00:12:17+5:302017-06-17T00:12:17+5:30

मानेगाव : गेल्या जवळपास ४-५ महिन्यापासून कोरडी ठण्ण पडलेली पुर्णामाय १३ जूनच्या रात्रीच्या पावसाने वाहायला लागली.

And it began to flow full! | अन् पूर्णामाय वाहायला लागली!

अन् पूर्णामाय वाहायला लागली!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मानेगाव : गेल्या जवळपास ४-५ महिन्यापासून कोरडी ठण्ण पडलेली पुर्णामाय १३ जूनच्या रात्रीच्या पावसाने वाहायला लागली.परिसरात पाऊस पडलेला नसताना पूर्णा नदी वाहत असल्याचे पाहून नागरिकांना आनंद झाला आहे.
मागील ४-५ महिन्यापासून नांदुरा-जळगाव जामोद मार्गावरील पुलावरून जातांना नदी पाणी नसल्याने अगदी रूक्ष वाटत होते. सोबतच पुर्णानदीच्या पात्रात असलेल्या बहुसंख्य गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतही पाणीटंचाई जाणवत होती. विशेषत: गुराढोरांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते. अशातच अमरावती, अकोला भागातील पावसामुळे नदीला अचानक पाणी आल्याने सर्वांना सुखद धक्काच बसला.
वास्तविक परिसरात अजुन पावसाचे आगमन नसतांना पूर्णामायला अशाप्रकारे पाणी येणे म्हणजे पूर्णा नदीवरून इरीगेशन करून शेतीला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुध्दा ही संजीवनीच ठरली.
त्यामुळे परिसरात यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात वाढ होईल हे निश्चित. मात्र त्याचसोबत रेती वाहतूक करणारे वाहन चालक तथा रेती तस्करासाठी ही दुखद बाब ठरली, हे ही तेवढेच खरे.

Web Title: And it began to flow full!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.