...आणि शाळेच्या भिंती बोलू लागल्या!, मुख्याधापकांनी स्वखर्चातून केले रंगकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:36 AM2017-12-11T04:36:35+5:302017-12-11T04:36:56+5:30
प्राथमिक शाळा पुढील वर्षी १५० व्या वर्षात पदार्पण करीत असताना डिजिटल स्कूलकडे वाटचाल करीत आहे. यानिमित्त विविध प्रकारची माहिती देणारी रंगरंगोटी केल्यामुळे प्राथमिक शाळेच्या भिंती बोलू लागल्या आहेत.
गजानन मापारी/ लोकमत न्यूज नेटवर्क
उंद्री (बुलडाणा) : येथील प्राथमिक शाळा पुढील वर्षी १५० व्या वर्षात पदार्पण करीत असताना डिजिटल स्कूलकडे वाटचाल करीत आहे. यानिमित्त विविध प्रकारची माहिती देणारी रंगरंगोटी केल्यामुळे प्राथमिक शाळेच्या भिंती बोलू लागल्या आहेत.
येथील नागपूर-पुणे महामार्गावरील जिल्हा परिषदेची केंद्रीय मराठी पूर्व प्राथमिक शाळा १५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. शाळेचे मुख्याध्यापक जी.व्ही. उबरहंडे यांनी ७० हजारांच्या जवळपास खर्च करत स्वखर्चातून शाळेच्या भिंती रंगवल्या.
यामध्ये भौगोलिक माहिती, इतिहास, विज्ञान, गणित, महापुरुषांचे विचार, तत्त्वज्ञान, संरक्षणविषयक माहिती निसर्गविषयक माहिती, प्राणीविषयक माहिती, म्हणी, बाराखडी यांनी शाळेच्या भिंती रंगविल्या आहेत. त्यामुळे या भिंती बोलक्या झाल्या असून गुरुजी नसतील त्यावेळी भिंतींकडे पाहून विद्यार्थी विद्यार्जनात रमून जातात.
संगणक शिक्षण, चालू घडामोडीविषयी विद्यार्थ्यांना माहिती देणे, यामुळे येथील शिक्षणाचा दर्जा वाढला आहे.