आंध्रप्रदेश, कर्नाटकच्या आंब्यावर बुलडाणेकरांची रसाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 04:41 PM2018-04-17T16:41:03+5:302018-04-17T16:41:03+5:30

बुलडाणा : फळांचा राजा असलेल्या आंब्याला जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीसारख्या नैसर्गीक संटकाचा फटका बसला. त्यामुळे यावर्षी आंध्रप्रदेश, कर्नाटक देवगड येथील अंब्यावर बुलडाणेकरांना आपली रसाळी भागवावी लागत आहे.

Andhra Pradesh, Karnataka's mangoes in Buldhana market | आंध्रप्रदेश, कर्नाटकच्या आंब्यावर बुलडाणेकरांची रसाळी

आंध्रप्रदेश, कर्नाटकच्या आंब्यावर बुलडाणेकरांची रसाळी

Next
ठळक मुद्देगेल्या काही आठवड्यापासून जिल्ह्यात परराज्यातील आंबा दाखल झाला आहे.कर्नाटकमधून लालबाग, पायरी, केशर, दशहरी, बदाम आदी प्रकारचे आंबे बुलडाण्याच्या बाजारा दिसून येत आहेत. साधा हापूस जवळपास २०० रुपये प्रतिकिलो, ओरीजनल हापूस ३०० रुपये प्रतिकिलो, लालबाग ८० ते १०० रुपये दर सध्या चालू आहेत.

  - ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा : फळांचा राजा असलेल्या आंब्याला जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीसारख्या नैसर्गीक संटकाचा फटका बसला. त्यामुळे यावर्षी आंध्रप्रदेश, कर्नाटक देवगड येथील अंब्यावर बुलडाणेकरांना आपली रसाळी भागवावी लागत आहे. परंतू सध्या अक्षयतृतीयेच्या पर्वावर आंब्याची मागणी वाढलेली असताना आवक मात्र कमी झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात आंब्याला हिवाळ्यात चांगला बहार आला होता. सर्वत्र आंबा बहाराने लदबदून गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मात्र जिल्ह्यात वेळोवेळी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस आल्याने आंब्याला फटका बसला. आंब्याला फळधारणा झाल्यानंतर पुन्हा फेब्रुवारीमध्ये अवकाळी पावसासह गारपीटीने झोडपले. यामध्ये आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने जिल्ह्यात इतर ठिकाणाहून आंब्याची आवक सुरू झाली आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गीक संकटाचा फटका बसल्याने जिल्ह्यातील आंबा बाजारापर्यंत येऊ शकला नाही. दरवर्षी साधारणत: गुढीपाडव्यापर्यंत बाजारात आंबा विक्रीसाठी येतो. मात्र यावर्षी तब्बल एक महिना उशीराने बाजारात आंब्याची आवक सुरू झाली. गेल्या काही आठवड्यापासून जिल्ह्यात परराज्यातील आंबा दाखल झाला आहे. त्यामध्ये आंध्रप्रदेश येथून साधा हापूस, देवगड येथील ओरीजनल हापूस, कर्नाटकमधून लालबाग, पायरी, केशर, दशहरी, बदाम आदी प्रकारचे आंबे बुलडाण्याच्या बाजारा दिसून येत आहेत. परंतू आंब्याचे भावही वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला हा आंबा चटका लावून जात आहे. साधा हापूस जवळपास २०० रुपये प्रतिकिलो, ओरीजनल हापूस ३०० रुपये प्रतिकिलो, लालबाग ८० ते १०० रुपये प्रतिकिलो, पायरी १३० ते १५० रुपये किलो, दशहरी १३० ते १५० रुपये किलो, बदाम १३० ते १५० रुपये प्रतिकिलो दर सध्या चालू आहेत. अक्षयतृतीयेच्या पर्वावर या आंब्याची मागणी वाढली आहे. परंतू यावर्षी आंब्याचे दर जास्त असल्याने अनेक ग्राहक दोन किलो आंबे घेण्याऐजवी एकाच किलोवर समाधान मानत आहेत.

अक्षयतृतीयेच्या पर्वावर आंब्याचा तुटवडा

वैशाख महिन्यातील साडेतीन महुर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला सर्र्वचजण आंबे खरेदी करतात. अनेकजण तर अक्षयतृतीया होईपर्यंत आंब्याच्या रसाला सुरूवात करत नाहीत. त्यामुळे आंबा खरेदीचे मार्केट अक्षयतृतीयेपासून वेग घेते. परंतू यावर्षी आंब्याची आवक कमी झाल्याने अक्षयतृतीयेच्या पर्वावरच आंब्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे दरवर्षी सारखी बाजारपेठही आंब्याने यावर्षी फुलली नाही.

फळांचा राजा महागला

यावर्षी सर्वत्रच अवकाळी पावसाचा फटका बसल्याने आंब्याची आवक पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नसल्याचे दिसून येत आहे. आंब्याची आवक घटल्याने भावही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. फळांचा राजा आंबा महागल्याने सर्वसामान्य ग्राहक माघारी फिरू लागले आहेत. हापूसचे दर प्रतिकिलो ३०० रुपयावर गेल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला हा आंबा परवडत नसल्याचे दिसून येत आहे.

यावर्षी एक महिना उशीराने आंबा बाजारात विक्रीसाठी आला आहे. सध्या बुलडाण्यात आंध्रप्रदेश, कर्नाटक, देवगड येथून आंबा येत आहे. आंब्याचे दर पाहून ग्राहकांची संख्याही दरवर्षीपेक्षा कमी आहे. - शेख रईस, बुलडाणा. विक्रेता.

Web Title: Andhra Pradesh, Karnataka's mangoes in Buldhana market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.