आयएसओ नामांकनासाठी अंगणवाड्यांची पाहणी
By admin | Published: September 11, 2014 11:31 PM2014-09-11T23:31:37+5:302014-09-11T23:31:37+5:30
लोणार तालुक्यातील १८ अंगणवाडींची आयएसओ नामांकनासाठी नोंद.
लोणार : तालुक्यातील १८ अंगणवाडी केंद्रांची आयएसओसाठी नोंदणी करण्यात आली असून, आज ११ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथील ह्यपारिजात कन्सल्टन्सी आयएसओ सर्टीफिकेशन अँण्ड ऑडीटींगह्ण या संस्थेने सदर अंगणवाड्यांची पाहणी केली.
तालुक्यातील रायगाव सर्कलमधील तीन, सुलतानपूर सर्कलमधील चार, बिबी सर्कलमधील पाच आणि हिरडव सर्कलमधील सहा अंगणवाडी केंद्रांची पाहणी करून आयएसओसाठी नोंदणी केली.
आयएसओसाठी लागणारी अंतर्गत सजावट व बाह्य सजावट, पूर्व प्राथमिक अनौपचारिक शिक्षणाचा दर्जा, आवश्यक दस्ताऐवज याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी यावेळी कार्यशाळा घेण्यात आली; तसेच संस्थेच्या प्रमुखांनी अंगणवाडी तील मुलांशीही संवाद साधला. तालुक्यातील अठरा अंगणवाडी केंद्रे आयएसओ दर्जा प्राप्त होणार असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी वासनिक यांनी दिली आहे.