अंगणवाडी सेविका,मदतनिसांची होरपळ

By admin | Published: August 19, 2015 01:50 AM2015-08-19T01:50:50+5:302015-08-19T01:50:50+5:30

एप्रिलपासून मानधन नाही ; कर्मचार्‍यांनाही वेतनाची प्रतीक्षा.

Anganwadi worker, helpers | अंगणवाडी सेविका,मदतनिसांची होरपळ

अंगणवाडी सेविका,मदतनिसांची होरपळ

Next

बुलडाणा : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस जवळपास चार ते पाच महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनिसांवर उपासमारीची वेळ आली असून, बालविकास प्रकल्प कार्यालयाचेही लाखो रुपये थकीत असल्यामुळे कर्मचार्‍यांनाही वेतनाची प्रतीक्षा आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या अनेक मागण्या कित्येक दिवसांपासून शासन दरबारी प्रलंबित राहत आहेत. त्यातच जिल्ह्यातील २ हजार ५00 अंगणवाडी सेविका व २ हजार ५00 अंगणवाडी मदतनिस कार्यरत आहेत; मात्र त्यांना एप्रिल महिन्यापासून मानधन न मिळाल्याने उपासमार सुरू आहे. मानधन मिळण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी वेळोवेळी मोर्चा व आंदोलने केली आहेत; तरीसुद्धा त्यांच्या मागण्या दुर्लक्षितच राहत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील अंगणवाड्यावर देखरेख करण्यासाठी बालविकास प्रकल्प कार्यालये आहेत. या प्रकल्प कार्यालयीन कर्मचार्‍यांचेही लाखो रुपये थकीत आहे. कर्मचार्‍यांना जवळपास तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सणासुदीचे दिवस असल्याने सण साजरा करण्यासाठी कर्मचार्‍यांना उधारीत व्यवहार करावे लागत आहेत, तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन कर्मचार्‍यांचे थकीत दीड कोटी रुपये तत्काळ द्यावे, अशी अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच कर्मचार्‍यांमधून होत आहे.

Web Title: Anganwadi worker, helpers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.