अंगणवाडी सेविका, मदतनीसांची जिल्हा कचेरीत धडक; विविध मागण्यांसाठी मोर्चा 

By संदीप वानखेडे | Published: December 9, 2023 05:15 PM2023-12-09T17:15:50+5:302023-12-09T17:15:59+5:30

विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी काम बंद आंदोलन सुरू आहे.

Anganwadi workers, helpers strike at district office March for various demands | अंगणवाडी सेविका, मदतनीसांची जिल्हा कचेरीत धडक; विविध मागण्यांसाठी मोर्चा 

अंगणवाडी सेविका, मदतनीसांची जिल्हा कचेरीत धडक; विविध मागण्यांसाठी मोर्चा 

बुलढाणा : विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी काम बंद आंदोलन सुरू आहे. मागण्यांची दखल न घेतल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी ९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली़ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दोन हजार ६८३ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराचे वितरण ठप्प झाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, किमान वेतन २६ हजार, पेन्शन, ग्रॅज्युटी आणि सामाजिक सुरक्षा इत्यादी प्रमुख मागण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे आंदोलन सुरू आहे.

 एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना गेल्या अनेक वर्षांपासून अगदी ५० रुपयांपासून ते १० हजार रुपये इतक्या तुटपुंजा मानधनावर राबविले जात आहे. लसीकरण मोहीम, गरोदर माता,स्तनदा मातांचे लसीकरण, पोषण आहार, गृहभेटी, ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार, ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना पूरक पोषण आहार बरोबर पूर्व प्राथमिक शिक्षण, त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भौतिक विकासाच्या दृष्टीने हसत-खेळत शिक्षण देणे, ई-आकार प्रशिक्षण, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, ऑनलाइन माहिती भरणे, रजिस्टर भरणे, जनजागृतीपर कार्यक्रम राबविणे, शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे वेगवेगळे उपक्रम राबविणे, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविणे, भाग्यश्री योजनेचा लाभ मिळवून देणे अशी अनेक कामे अंगणवाडी सेविका करीत आहेत. तरीही त्यांना अल्प मानधन मिळत आहे. त्यामुळे राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सरकारने मागण्यांची दखल न घेतल्याने जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी ९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली़ या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नंदू गायकवाड, बुलढाणा जिल्हा सचिव सुरेखा तळेकर, तुळसा बोपले, शालिनी सरकटे, शशीकला नारखेडे, अलका राउत आदींसह इतरांनी सहभाग घेतला. 
 

Web Title: Anganwadi workers, helpers strike at district office March for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.