न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा खामगावात मोर्चा
By अनिल गवई | Published: December 29, 2023 01:34 PM2023-12-29T13:34:06+5:302023-12-29T13:34:51+5:30
याबाबत सविस्तर असे की, विविध न्याय मागण्यासाठी ४ डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस संपावर असल्याने अंगणवाडी इमारती बंद आहेत.
खामगाव: आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस चार डिसेंबरपासून संपावर गेल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी स्थानिक आमदार ॲड. आकाश फुडकर यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी राज्य शासनाविरोधात तीव्र निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली.
याबाबत सविस्तर असे की, विविध न्याय मागण्यासाठी ४ डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस संपावर असल्याने अंगणवाडी इमारती बंद आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनिस ठराविक मुदतीनुसार टप्प्या टप्पयाने विविध आंदोलन करीत आहेत. शुक्रवारी स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून या मोर्चाला सुरूवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा मुख्य मार्गाने टॉवर चौकातील भाजप कार्यालयावर पोहोचला. याठिकाणीही अंगणवाडी कर्मचार्यांनी तीव्र निदर्शने केली.