अंगणवाडी सेविकांचा मोबाईल ‘हॅंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:51 AM2021-01-08T05:51:33+5:302021-01-08T05:51:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : गाव पातळीवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना शासनाकडून माेबाईल देण्यात आले हाेते. मात्र, कामाचा लाेड ...

Anganwadi worker's mobile 'hangs' | अंगणवाडी सेविकांचा मोबाईल ‘हॅंग’

अंगणवाडी सेविकांचा मोबाईल ‘हॅंग’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : गाव पातळीवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना शासनाकडून माेबाईल देण्यात आले हाेते. मात्र, कामाचा लाेड वाढल्याने माेबाईल वारंवार ‘हॅंग’ हाेत असल्याने अंगणवाडी सेविका त्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने अंगणवाडी सेविकांना रजिस्टरमध्ये अहवाल लिहिण्याचे आदेश दिले आहेत. भाजप-सेनेच्या काळात अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारकडून माेबाईल देण्यात आले आहेत. या माेबाईलवर हजेरीपासून ते घराेघरी भेटीचे अहवाल माेबाईलवर भरावे लागतात. गेल्या काही दिवसांपासून कामाचा लोड वाढल्याने मोबाईल हॅंग हाेत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका त्रस्त झाल्या आहेत. गावपातळीवर विविध सर्वेक्षणासह इतर कामे अंगणवाडी सेविकांना करावी लागतात. तसेच शासनाकडून कुपाेषित बालक आणि किशाेरींसाठी आलेल्या साहित्य वाटपाचा हिशाेबही माेबाईलवर द्यावा लागताे. नेटवर्क नसल्याने तसेच माेबाईइल हॅंग हाेत असल्याने अंगणवाडी सेविका त्रस्त झाल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने माेबाईलची समस्या उद्भवल्याने रजिस्टरवर माहिती भरण्याचे आदेश नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले आहेत.

अडचणी काय !

ग्रामीण भागात नेटवर्क मिळत नसल्याने अनेक अडचणी येतात. फाेन वारंवार हॅंग हाेत असल्याने कुठलाही अहवाल तातडीने सादर करता येत नाही. तसेच फाेटाे अपलाेड केला असता ताे फाॅरवर्ड हाेत नाही. बिघाड झाल्यास लवकर माेबाईल मिळत नाही, अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागताे.

१७ रजिस्टर घेण्याचे सेविकांना आदेश

माेबाईल वारंवार हॅंग हाेत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने अंगणवाडी सेविकांना रजिस्टरमध्ये नाेंदी करण्याचे आदेश दिले आहेत. या नाेंदीसाठी जवळपास १७ प्रकारचे रजिस्टर लागणार आहेत. त्यामुळे त्यासाठी पैसे काेण देणार, हा प्रश्नच आहे.

मोबाईलवरुन ही कामे करावी लागतात

अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसाची हजेरी माेबाईलवरून पाठवावी लागते. अंगणवाडीत पाेहोचल्यानंतर फाेटाे पाठवावा लागताे.

कुपाेषित बालकांचे सर्वेक्षण करून त्यांना आहाराचे वाटप करावे लागते. त्याची माहिती माेबाईलवरून द्यावी लागते.

अंगणवाडी सेविकांनी दरराेज पाच घरांना भेट देऊन त्यांचा अहवाल माेबाईलवरून सादर करावा लागताे.

किशाेरवयीन मुलींसाठी सॅनिटरी शासनाकडून माेफत देण्यात येते. त्याचे वितरण अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येते. त्याचीही माहिती भरावी लागते.

महिनाभर केलेल्या विविध कामांचा अहवाल अंगणवाडी सेविकांना माेबाईलवरूनच सादर करावा लागताे.

गावात हाेणारे विविध प्रकारचे सर्वेक्षण, लाेकसंख्या आणि रुग्ण यांच्याविषयीची माहिती अंगणवाडी सेविकांना माेबाईलच्या माध्यमातून भरावी लागते.

Web Title: Anganwadi worker's mobile 'hangs'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.