बुलडाणा येथे पार पडला अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा जिल्हा मेळावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:10 AM2017-12-21T00:10:30+5:302017-12-21T00:10:38+5:30

बुलडाणा : सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा जिल्हा मेळावा स्थानिक सामाजिक न्याय भवनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात १७ डिसेंबर रोजी पार पडला. 

Anganwadi workers' organization organized a district rally in Buldana! | बुलडाणा येथे पार पडला अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा जिल्हा मेळावा!

बुलडाणा येथे पार पडला अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा जिल्हा मेळावा!

Next
ठळक मुद्देसंघटनेच्या राज्य सचिव कॉम्रेड शुभा शमीम जिल्हा अध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा जिल्हा मेळावा स्थानिक सामाजिक न्याय भवनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात १७ डिसेंबर रोजी पार पडला. 
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य सचिव कॉम्रेड शुभा शमीम तर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर संघटनेच्या जिल्हा सचिव सरला मिश्रा, कुसुम चहाकर, कोषाध्यक्ष जयश्री क्षीरसागर, राज्य सदस्य माया तायडे, मंदा डोंगरदिवे, सुनंदा  मोरे, संगीता मादनकर, पुंजाबाई चोपडे, प्रतिभा वक्ते, शैला उबरहंडे, पार्वती पाटील, उषा जैवळ आदी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना शुभा शमीम म्हणाल्या की, शासन बालकांच्या उपस्थितीवर बोट ठेवून कमी उपस्थिती असलेली केंद्रे बंद करून त्याचे समायोजन इतर केंद्रामध्ये करण्यात येणार आहे. तसेच पूर्वप्राथमिक ३ ते ६ अंगणवाडी केंद्रात येणारा वयोगट जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शाळेला जोडून अंगणवाडी केंद्रे बंद करण्याचा घाट सरकार घालत आहे. या कामगार विरोधी व जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनिसांनी  सीटूच्या नेतृत्वात संघटित होऊन सरकारचे हे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे.
मेळाव्यामध्ये राज्य स्तरावर  महिला अँथलेटिक्समध्ये १५00 मीटर रनिंगमध्ये सुवर्णपदक तथा ३00 मीटर वॉकमध्ये रजतपदक मिळविल्याबद्दल वैशाली चाहकर यांचा सत्कार कॉ. शुभा शमिम यांच्या हस्ते करण्यात आला. संचालन वैशाली चाहकर यांनी केले.
 

Web Title: Anganwadi workers' organization organized a district rally in Buldana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.