मलकापूर येथे अंगणवाडी कर्मचार्यांचा मोर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 12:47 AM2017-10-05T00:47:52+5:302017-10-05T00:50:00+5:30
मलकापूर : पंकुताई तुला आमच्यावर भरवसा नाय काय, नाय काय.! मग आम्हाला वेतनवाढ का देत नाय, देत नाय.! यासह विविध गगनभेदी घोषणासह संतप्त अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी महिलांनी एसडीओ कार्यालयावर बुधवारी धडक मोर्चा काढला. पंचायत समिती कार्यालयासमोर तीन तास शासन विरोधी निदर्शने केली. या आगळ्या वेगळ्या आंदोनामुळे मलकापूर अक्षरशा दणाणून गेले.

वेतनवाढीच्या मुद्यासह अन्य २१ मागण्यावरुन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनीयनच्या वतीने राज्यभर संप पुकारण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मलकापूर तालुक्यातील अंगणवाडी बालवाडी कर्मचारी महिलांच्या वतीने जिल्हाध्यक्ष जे.एच.मौर्या यांच्या नेतृत्वात एसडीओ कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला व शेकडोच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर मोर्चेकर्यांनी त्यांचा मोर्चा पंचाय त समिती कार्यालयाकडे वळविला. प्रवेशव्दारी ठिय्या देण्यात येवून तीन तास निदर्शन ेकरण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासन हाय हाय, ग्रामविकास मंत्री हाय हाय यासह विविध घोषणा संत प्त अंगणवाडी बालवाडी कर्मचारी महिलांनी दिल्या. यावेळी प्रमुख पदाधिकार्यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधीत केले.
दरम्यान पंचायत समितीच्या एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकार्यांना निवेदन सादर करण्यात येवून त्यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा झाली. त्यात आंदोलनकर्त्यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष कॉ.जे.एच.मौर्या, उपाध्यक्ष संगिता ठाकूर, सचिव निता तायडे, शैला खापोटे आदींनी सहभाग घेतला. अंगणवाडी कर्मचारी महिलांच्या धडक मोर्चा व निदर्शनामुळे मलकापूर अक्षरशा दणानून गेले.
अंगणवाडी कर्मचार्यांच्या वेतनवाढ, मदतनिसांच्या मानधनात वाढ यासह विविध मागण्यांसह राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. आता मोर्चा व धरणे देण्यात आले. तरीही कारवाई न झाल्यास यापुढे बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा, मेहकर, चिखली, बुलडाणा येथे जेलभरो आंदोलन करण्यात येईल.
- कॉ.जे.एच.मौर्या
राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष (आयटक)