राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पशु विज्ञान केंद्र सुरू करणार - पशुसंवर्धन मंत्री

By admin | Published: July 6, 2017 07:58 PM2017-07-06T19:58:24+5:302017-07-06T20:09:39+5:30

दे.राजा दवाखान्याला १० लाख रुपये : जिल्ह्यातील ७ पशुवैद्यकीय दवाखान्यांना आएसओ मानांकन प्राप्त

Animal science center will be started in every district in the state - Minister of Animal Husbandry | राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पशु विज्ञान केंद्र सुरू करणार - पशुसंवर्धन मंत्री

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पशु विज्ञान केंद्र सुरू करणार - पशुसंवर्धन मंत्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पशु विज्ञान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुसंवर्धन व त्याच्या संबंधीत क्षेत्रांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच राज्यात २७ हजार ७५२ ग्रामपंचायतीमध्ये पशु सखींची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी गुरूवारी येथे केली.
जिल्हा परिषदेच्या श्री शिवाजी सभागृहात जिल्ह्यातील सात पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ मानांकन प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात  आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जि.प अध्यक्ष उमाताई तायडे, उपाध्यक्षा मंगलाताई रायपूरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती दिनकर देशमुख, समाज कल्याण सभापती डॉ. गोपाल गव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, पशुसंवर्धन विभागाच्या अमरावती विभागाचे सहआयुक्त डॉ. प्रकाश चव्हाण,  उपायुक्त डॉ. विलास जायभाये, दत्ता खरात, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील पसरटे, आएसओ संस्थेचे प्रशांत जोशी आदी उपस्थित होते.
आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी संस्थेला कुठल्याही प्रकारचा निधी देण्यात येत नसल्याचे सांगत जानकर म्हणाले, आयएसओ मानांकन हे लोकसहभागातून प्राप्त झाले पाहिजे. या मानांकनानंतर संस्थेकडे नागरिकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. कामाचे मुल्यांकन होते. पशुसंवर्धन म्हणजे शेतकरी कुटूंबाला मिळणारे एएटीएम आहे. प्रत्येक कुटूंबाने शेळी, म्हैस, गाय व कोंबड्या पाळल्यात, उत्पन्न हमखास मिळते. त्यामुळे शेतीवरचा भार कमी होवून कुटूंबाला आर्थिक मदत प्राप्त होते. या विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी नुकतीच एमपीएससीच्या माध्यमातून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय या विभागांतही रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहे.  दुधाचे दर ७ रूपयांनी वाढविले आहे. याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होत आहे. आता प्रत्येक गावात पशूसखींची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही सखी गावातील महिलांना, शेतकऱ्यांना, शेतमजूरांना पशुसंवर्धन विभागाच्या योजना, जनावरांचे लसीकरण, रोग प्रतिबंधक उपाय, बाजारपेठ याविषयी प्रशिक्षीत करेल. तसेच गाय, म्हैस यांच्या गर्भारपणामध्ये वेताच्यावेळी काळजी घेण्यासाठी एसएमएस सुविधा देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या नजीकच्या डॉक्टरला एसएमएस केल्यास लगेच वैद्यकीय सुविधा मिळेल. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एन.डी.डी.बी) च्या माध्यमातून जिल्ह्यात दुग्धविकास होणार आहे. दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केल्या जाणार आहे.    
याप्रसंगी उमाताई तायडे यांनी आयएसओ नामांकन मिळविलेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.  कार्यक्रमादरम्यान प्रशांत जोशी यांनी आयएसओ करण्याची प्रक्रिया विषद केली व सातही पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या व्हिडीओ क्लिपचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचलन डॉ. जैस्वाल यांनी, तर आभार डॉ. चरखे यांनी मानले.

 

Web Title: Animal science center will be started in every district in the state - Minister of Animal Husbandry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.