उपसभापती पदासाठी फेरनिवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:28 AM2017-08-26T00:28:10+5:302017-08-26T00:28:40+5:30

चिखली पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक गत १४ मार्च २0१७ रोजी पार पडली होती. ही निवडणूक प्रक्रिया अवैध ठरविण्यात आल्याने या पदासाठी फेर निवडणूक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी तहसीलदार चिखली यांना दिले आहेत.  त्यानुसार १ सप्टेंबर २0१७ रोजी उपसभापती पदासाठी फेर निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीमुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तर फेरनिवडणुकीचे वृत्त कळताच पं.स. वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Announcing the referendum for the post of Vice President | उपसभापती पदासाठी फेरनिवडणूक कार्यक्रम जाहीर

उपसभापती पदासाठी फेरनिवडणूक कार्यक्रम जाहीर

Next
ठळक मुद्देचिखली पंचायत समितीराजकीय समीकरणे बदलणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: चिखली पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक गत १४ मार्च २0१७ रोजी पार पडली होती. ही निवडणूक प्रक्रिया अवैध ठरविण्यात आल्याने या पदासाठी फेर निवडणूक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी तहसीलदार चिखली यांना दिले आहेत.  त्यानुसार १ सप्टेंबर २0१७ रोजी उपसभापती पदासाठी फेर निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीमुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तर फेरनिवडणुकीचे वृत्त कळताच पं.स. वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
एकूण १४ सदस्य संख्या असलेल्या चिखली पंचायत समितीमध्ये सद्यस्थितीत भाजपा ७, काँग्रेस ५, शेतकरी संघटना १ आणि शिवसेना १ असे पक्षीय बलाबल आहे. 
एकूण सदस्य संख्या पाहता कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सभापती आणि उपसभापती पदासाठी गत १४ मार्च २0१७ रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणूक प्रक्रियेत सभापती पदासाठी झालेल्या मतदानात सदस्यांचे संख्याबळ कमी असतानाही काँग्रेसने बाजी मारल्याने काँग्रेसच्या संगीता संजय पांढरे सभापतीपदी विराजमान झाल्या होत्या. 
तर अटीतटीची ठरलेल्या या लढतीसाठी भाजपाचा एक सदस्य गैरहजर राहिल्याने सभागृहामध्ये १३ सदस्य उपस्थित राहिले होते. तसेच उपसभापती पदासाठी एका उमेदवाराचा अर्ज उशिरा प्राप्त झाल्याने उपसभापती पदावर भाजपाचे जितेंद्र कन्हैयालाल कलंत्री हे अविरोध निवडून आले होते. दरम्यान, उपसभापती पदासाठी झालेली निवडणूक प्रक्रिया पारदश्रीपणे राबविली नसल्याचा ठपका ठेवत या  निवडणुकीस अवैध ठरवून फेरनिवडणूक घेण्याबाबत तक्रार शिवसेनेच्या वैशाली प्रभाकर कर्‍हाडे यांनी केली होती. 
त्यांच्या तक्रारीनुसार ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे उपसचिव यांचे पत्र आणि विभागीय आयुक्त अमरावती यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी तहसीलदार चिखली तसेच पं.स. संवर्ग विकास अधिकारी यांना चिखली पंचायत समितीच्या उपसभापती पदाची फेरनिवडणूक घेण्याचे आदेश जारी केले आहेत. या निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, १ सप्टेंबर २0१७ रोजी सकाळी १0 ते दुपारी १२ वाजेपर्यंत उपसभापती पदाकरिता नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार येऊन याची दिवशी दुपारी २ वाजता उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या सभेच्या कामकाजास सुरुवात होणार आहे. 

Web Title: Announcing the referendum for the post of Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.