बुलडाणा जिल्ह्यात पावसाने गाठली वार्षिक सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 03:37 PM2019-09-27T15:37:30+5:302019-09-27T15:37:35+5:30

चार मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून बुलडाणा, चिखली तालुक्यातस जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

Annual average rainfall received in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात पावसाने गाठली वार्षिक सरासरी

बुलडाणा जिल्ह्यात पावसाने गाठली वार्षिक सरासरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: तब्बल सहा वर्षानंतर पावसाने बुलडाणा जिल्ह्यात जवळपास पावसाची वार्षिक सरासही गाठली असून सहा तालुक्यांमध्येही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील चार मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून बुलडाणा, चिखली तालुक्यातस जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे पैनगंगेच्या उगम क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पैनगंगेला मोठा पूर आल्यामुळे पेनटाकळी प्रकल्पाच्या नऊ दरवाज्यातून १० हजास ०१५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सद्या सुरू आहे.
दरम्यान, या पावसामुळे नदी काठच्या ज्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणेने दिले आहेत. दरम्यान, शेलूद दिवठाणा शिवारातील शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. पैनगंगेच्या उगम क्षेत्रातीलही बºयाच भागात अशी स्थिती असून ग्रामीण भागातून येणाºया माहितीच्या आधारावर महसूल प्रशासन संभाव्य नुकसानाचे आकलन करत आहेत.
दुसरीकडे २०१३ मध्ये जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १३८ टक्के पाऊस झाला होता. त्यानंतर प्रथमच बुलडाणा जिल्ह्यात पावसाने सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर वार्षिक सरासरी ओलांडली आहे. बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पावसाची नोंद होत असते. पावसाळ््याचा चौथा महिन्या संपण्यात असताना पावसाने ९९.७६ टक्के सरासरी गाठली आहे. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका (१३७.५ मिमी), मलकापूर (१२४.२३), बुलडाणा १२०.५९ (मिमी) खामगाव (१०७.२७), शेगाव (१०६.९७) आणि नांदुरा तालुक्यात १०१.२८ मिमी पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. या सहा ही तालुक्यांनी पावसाची वार्षिक ससरासी ओलांडली आहे. दरम्यान, जळगाव जामोद (९९.५८), मोताळा (९८.४३), चिखली (९२.८९) आणि सिंदखेड राजातही (९०.२१) पाऊस सरासरी गाठण्याच्या असापास आला आहे. पावसाचे प्रमाण येत्या काळात असेच राहिल्यास हे चार तालुकेही वार्षिक सरासरी गाठतील असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, देऊळगाव राजा (६४.८७), लोणार तालुका ७५.३२ आणि लोणार तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ८२.६५ टक्के पाऊस पडला आहे. हे तीनही तालुक्या पावसाच्या सरासरीच्या मागे आहेत. येथील परिस्थितीही काहीशी बिकट असल्याचे चित्र आहे.
चार मंडळात अतिवृष्टी
सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यातील कवठल (८४.५मिमी), मेहकर (६९.७), मलकापूर (९०.७) आणि वझर मंडळामध्ये ८८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या मंडळामध्ये पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे २५ सप्टेंबर रोजी रात्री पडलेला पाऊस हा मुसळधार होता. त्यामुळे अल्पकालावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला व नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागले.
नुकसानाचा सर्व्हे करण्यो निर्देश
४या पावसामुळे जिल्ह्यातील बºयाच भागात शेतीचे नुकसान झाले आहे. काहींची शेत जमीन खरडून गेली तर नदी काठच्या भागातील शेतकºयांच्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. पृष्ठभूमीवर महूल विभागाने हे निर्देश दिले आहेत. खामगाव तालुक्यालगतच्या ज्ञानगंगा धरणालगत दिवठाणा परिसरातील काही घरांना पाण लागल्याने तेथील परिस्थिती पाहता येथील काही नागरिकांना तातडीने रात्री अन्यत्र हलविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली.

Web Title: Annual average rainfall received in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.