जिल्ह्याचा वार्षिक पतआराखडा ३,७१० कोटींचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:01+5:302021-04-30T04:44:01+5:30
प्राथमिक क्षेत्रात प्रामुख्याने कृषी व सलग्न सेवांसाठी दोन हजार २५० कोटी रुपये तरतूद आहे. त्यात पीककर्जासाठी १,५५० कोटी ...
प्राथमिक क्षेत्रात प्रामुख्याने कृषी व सलग्न सेवांसाठी दोन हजार २५० कोटी रुपये तरतूद आहे. त्यात पीककर्जासाठी १,५५० कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. लघु व मध्यम उद्योगासाठी ४२५ कोटी रुपये, शैक्षणिक कर्जासाठी ४५ कोटी, गृहनिर्माण क्षेत्रासाठी ३०० कोटी आणि अन्य क्षेत्रासाठी जवळपास ४५० कोटी रुपये तरतूद आराखड्यांतर्गत करण्यात आली आहे.
-- दहा हजार उद्योजकांना लाभ--
लघू व मध्यम उद्योगासाठी ४२५ कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या पत आराखड्यात करण्यात आलेली असून, त्याचा फायदा जिल्ह्यातील जवळपास दहा हजार लघू उद्योजकांना होणार आहे.
-- २६ टक्क्यांनी तरतूद कमी--
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पत आराखड्यात गत वर्षीच्या तुलनेत जवळपास २६ टक्क्यांनी घट आली आहे. गेल्या वर्षीचा पत आराखडा हा ४,६६५ कोटी १६ लाख रुपयांचा होता. मात्र, यंदा पत आराखड्यात तरतूद कमी करण्यात आल्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर काही प्रमाणात विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्याचे स्थूल उत्पन्न २४ हजार ६६८ कोटी रुपये आहे. त्यावर नेमका याचा कसा परिणाम होतो हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
--अशी आहे तरतूद--
क्षेत्र तरतूद टक्केवारी
पीक कर्ज : १५५० कोटी ४५ टक्के
कृष सलग्न सेवा : ७०० कोटी २० टक्के
लघू व मध्यम उद्योग : ४२५ कोटी १२ टक्के
शैक्षणिक क्षेत्र : ४५ कोटी ०१ टक्के
गृहनिर्माण क्षेत्र : ३०० कोटी ०९ टक्के
अन्य क्षेत्र : ४५० कोटी १३ टक्के
कृषी सलग्न सेवा