बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३० जण काेराेना पाॅझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 01:00 PM2020-11-29T13:00:16+5:302020-11-29T13:00:27+5:30
CoronaVirus in Buldhana शनिवारी आणखी ३० जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.
बुलडाणा: जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून शनिवारी आणखी ३० जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. तसेच १ हजार २७१ अहवाल निगेटीव्ह आला असून ४० जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १ हजार ३०१ अहवाल शनिवारी प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील २५ व रॅपीड टेस्टमधील ५ अहवालांचा समावेश आहे. पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये खामगांव शहरातील तीन, दे. राजा शहरातील एक, दे. राजा तालुक्यातील गोंधनखेड दाेन, बुलडाणा शहरातील तीन , शेगाव शहरातील दाेन , नांदुरा शहरातील एक , चिखली शहरातील तीन , जळगाव जामोद शहरातील तीन , जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा एक, सिंदखेड राजा शहरातील चार , सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबिड एक, मूळ पत्ता रामदास पेठ, अकोला एक, जळगाव खान्देश येथील पाच जणांचा समावेश आहे. तसेच शनिवारी ४० जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. यामध्ये खामगांव शहरातील १८ , बुलडाणा स्त्री रुग्णालयातील एक, नांदुरा एक, चिखली शहरातील ८, शेगाव शहरातील तीन, सिंदखेड राजा शहरातील ९ रुग्णांचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत ७३ हजार ३२१ अवाहल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १० हजार ६०३ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.