जिल्ह्यात आणखी ३२ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:35 AM2021-01-23T04:35:09+5:302021-01-23T04:35:09+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असून शुक्रवारी आणची ३२ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ...
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असून शुक्रवारी आणची ३२ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ४६१ अहवाल निगेटिव्ह आले असून २८ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी शुक्रवारी एकूण ४९३ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४६१ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ३२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील पाच , बुलडाणा तालुका चांडोळ १, जनुना १, चिखली तालुका बेराळा १, चिखली शहर : १, लोणार तालुका खुरमपूर ४, मोताळा तालुका तळणी १, मेहकर शहर २, मेहकर तालुका वरवंड १, खामगांव तालुका पळशी १, शेगांव शहर ९, शेगांव तालुका वरखेड १, दे. राजा शहर २, सिं. राजा तालुका ताडशिवणी १, मलकापूर पांग्रा येथील एकाचा समावेश आहे.
काेराेनावर मात केल्याने सिं. राजा येथील दाेन , खामगांव येथील पाच , लोणार २, जळगांव जामोद २, मलकापूर ८, चिखली १, मोताळा १ , शेगांव येथील सात रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत ९९ हजार १८१ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १३ हजार १६ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.
तसेच १७१३ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १३ हजार ५३९ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी १३ हजार १६ कोरोनाबाधित रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ३६० कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १६३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.