बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३३ कोरोना पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 11:41 AM2020-10-13T11:41:18+5:302020-10-13T11:41:29+5:30
सोमवारी आणखी ३३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी आणखी ३३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच २९४ अहवाल निगेटीव्ह आले असून १०८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३२७ अहवाल सोमवारी प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३२ व रॅपिड टेस्टमधील एका अहवालाचा समावेश आहे.
पॉझिटीव्ह आलेले रुग्णांमध्ये मलकापूर शहरातील तीन ,मलकापूर तालुक्यातील दुधलगांव येथील एक, शेगांव शहरातील एक, शेगांव तालुक्यातील निंबा येथील एक, माटरगांव १, खामगांव शहर २, खामगांव तालुका टेंभुर्णा १, घाटपुरी २, मोताळा शहरातील एक , लोणार तालुका रायगांव येथील एक, जळगांव जामोद शहर १, जळगांव जामोद तालुका आसलगांव २, इस्लामपूर १, बुलडाणा शहर ८, मेहकर तालुका दुधलगांव १, सिं. राजा तालुका साखरखेर्डा २, पळसखेड चक्का १, चिखली शहर १, चिखली तालुका गुंजाळा १, सवणा येथील एका रुग्णांचा समावेश आहे. तसेच आज
बुलडाणा आयुर्वेद महाविद्यालय ७, अपंग विद्यालय २, नांदुरा ५, चिखली ११, लोणार १८, मेहकर ९, सिं. राजा १५, दे. राजा १६, मोताळा ८, शेगांव ४, खामगांव ९, मलकापूर ४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत ३४ हजार ५६६ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच आजपर्यंत ७ हजार ५०३ कोरोना बाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. १८७ नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहे.जिल्ह्यात आजअखरे ८ हजार ९२ कोरोना बाधीत रुग्ण आहेत. त्यापैकी ७ हजार ५०३ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ४८३ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १०६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.