बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३६ काेराेना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 12:02 PM2020-11-03T12:02:38+5:302020-11-03T12:03:17+5:30
Buldhana CoronaVirus News जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरू असून साेमवारी ३६ जणांचा अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरू असून साेमवारी ३६ जणांचा अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. तसेच ४१३ अहवाल निगेटीव्ह आले असून ६१ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४४९ अहवाल साेमवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी ४१३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ३६ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३५ व रॅपीड टेस्टमधील एका अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ३२५ तर रॅपिड टेस्टमधील ८८ अहवालांचा समावेश आहे. जिल्ह्यात साेमवारी सर्वाधीक निगेटीव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.
तसेच आजपर्यंत ४७ हजार ५६ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ८ हजार ९११ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. २हजार ६५६ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ४७ हजार ५६ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ९ हजार ५१३ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ८ हजार ९११ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ४७६ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १२६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.