बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३६ कोरोना पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 11:03 AM2020-07-11T11:03:46+5:302020-07-11T11:03:55+5:30

जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या ४१३ वर पोहचली आहे.

Another 36 corona positive in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३६ कोरोना पॉझिटीव्ह

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३६ कोरोना पॉझिटीव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून १० जुलै रोजी आणखी ३६ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. शुक्रवारी ४४६ अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून त्यापैकी ४१० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या ४१३ वर पोहचली आहे. त्यापैकी १७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील १० व रॅपिड टेस्टमधील २६ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ९१ तर रॅपिड टेस्टमधील ३१९ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ४१० अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह अहवालामध्ये नांदुरा येथील नउ, मलकापूर येथील पाच, बुलडाणा येथील एक, शेगांव येथील चार, सिंदखेड राजा येथील एक, दे. राजा येथील एक, चिखली येथील दोन तसेच खामगांव येथील १३ जणांचा समावेश आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात ३६ पॉझीटीव्ह रूग्ण आढळले आहे.
१२ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये पारपेठ मलकापूर येथील एक, मेरा ता. चिखली एक, चिखली एक, कदमपुर ता. खामगाव येथील ९ रूग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ३९७० रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत २२४ रुग्णांना कोरोनावर मात केल्याने सुट्टी देण्यात आली आहे. २०९ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत.
जिल्ह्यात ४१३ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी २२४ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात १७४ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १५ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: Another 36 corona positive in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.