बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३६२ कोरोना पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 12:09 PM2021-03-14T12:09:46+5:302021-03-14T12:10:07+5:30

CoronaVirus : शनिवारी ३६२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून ५३५ जणांनी कोरोनावर मात केली.

Another 362 corona positive in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३६२ कोरोना पॉझिटिव्ह 

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३६२ कोरोना पॉझिटिव्ह 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात शनिवारी ३६२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून ५३५ जणांनी कोरोनावर मात केली. प्रयोगशाळेत शनिवारी एकूण १,३६४ जणांचे अहवाल तपासण्यात आले. त्यापैकी १००२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सुदैवाने शनिवारी जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. गेल्या सात दिवसांचा विचार करता जिल्ह्यात १८ जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शनिवार हा एक प्रकारे सुखद दिवस म्हणावा लागले.
 पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ३४, सुंदरखेड तीन, चांडोळ एक, इरला एक, पांगरी एक, पिंपळगाव सराई एक, शिरपूर दोन, मढ दोन, खामगाव ५०, सुटाळा सहा, पि. राजा दोन, पारखेड दोन, लाखनवाडा चार,  मामुलवाडी दोन, मलकापूर ४१, लोणवडी चार,   चिखली ५६, पळसखेड जयंती दोन,  वरूड दोन, पेठ दोन, अमडापूर तीन,  धोत्रा नाईक दोन, कोलारा दोन, तोरणवाडा दोन, सोमठणा दोन,  करवंड दोन,  अंत्री खेडेकर दोन, सि. राजा चार,  दुसरबीड दोन, हिवारखेड पूर्णा दोन, रताळी दोन, बाळ समुद्र दोन,, चिंचखेड दोन,  शेगाव सहा, सोनाळा चार,  टूनकी दोन, पातुर्डा दोन, संग्रामपूर चार,  आसलगाव दोन,  दे. राजा २४, धोत्रा नंदई दोन, लोणार आठ, वडगाव तेजन चार, परभणी जिल्ह्यातील हांडा येथील एकाचा समावेश आहे.
एकूण रुग्णांची संख्या २४ हजार ४६९ झाली असून त्यापैकी ३२९६ सक्रिय रुग्ण आहेत. ३०९७ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. 

Web Title: Another 362 corona positive in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.