जिल्ह्यात आणखी ४४ काेराेना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:29 AM2021-01-13T05:29:45+5:302021-01-13T05:29:45+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, आणखी ४४ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ३७२ अहवाल निगेटिव्ह असून, ...
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, आणखी ४४ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ३७२ अहवाल निगेटिव्ह असून, ४६ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४१६ अहवाल रविवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी ३७२ अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील पाच , खामगाव शहरातील पाच, दे. राजा तालुक्यातील दे.मही १, दे. राजा शहरातील ३ , मोताळा शहरातील दाेन, चिखली शहरातील सात , शेगाव तालुक्यातील जवळा २, शेगाव शहरातील ९ , नांदुरा शहरातील एक , चिखली तालुक्यातील आमखेड १, इसोली १, चंदनपूर १, काटोडा १, मेहकर तालुक्यातील भालगाव १, सिं. राजा तालुक्यातील पळसखेड चक्का १, मूळ पत्ता सावरखेड गोंधन ता. जाफ्राबाद १, नांदुरा तालुक्यातील धाडी येथील एका समावेश आहे. तसेच काेराेनावर मात केल्याने बुलडाणा शहरातील अपंग विद्यालयातून चार, नांदुरा येथून ८, शेगाव येथून दाेन, चिखली येथून ११, खामगाव १३, मोताळा येथील सात, दे.राजा येथील एका रुग्णाला सुटी देण्यात आली आहे.
आजपर्यंत ९३ हजार ८८९ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १२ हजार ४८६ कोरोनाबाधीत रुग्ण निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.
तसेच ८१६ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण १२ हजार ९५८ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी १२ हजार ४८६ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३१५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.