जिल्ह्यात आणखी ४६ पाॅझिटिव्ह : १९ जणांची काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:50 AM2021-01-08T05:50:58+5:302021-01-08T05:50:58+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून आणखी ४६ जणांचा अहवाल साेमवारी पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ४५६ अहवाल निगेटिव्ह ...
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून आणखी ४६ जणांचा अहवाल साेमवारी पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ४५६ अहवाल निगेटिव्ह आले असून १९ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३२२ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी साेमवारी एकूण ५०२ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४५६ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ४६ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये खामगाव शहरातील सात, खामगाव तालुका हिवरा बु. १, बुलडाणा शहर ११, बुलडाणा तालुक्यातील येळगाव १, पोखरी १, मलकापूर शहरातील एक, दे. राजा शहरातील सहा, चिखली शहरातील एक, चिखली तालुक्यातील खंडाळा १, देऊळगाव मुंढे १, टाकरखेड १, मेंडगाव १, मोताळा शहर : १, मोताळा तालुक्यातील पिं. देवी २, सिं. राजा तालुक्यातील दे. कोळ १, शेगाव तालुक्यातील जवळा २, पाळोदी १, शेगाव शहरातील ३, मेहकर तालुक्यातील कल्याणा १, जळगाव जामोद शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच काेराेनावर मात केल्याने बुलडाणा आयुर्वेद महाविद्यालयातील एक , दे. राजा शहरातील सात, खामगावातील तीन, नांदुरा येथील दाेन, चिखली येथील तीन, मेहकर येथील एक व शेगाव येथील दाेघांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तसेच ५३५ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.
आतापर्यंत १५२ जणांचा मृत्यू
आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ९१ हजार ७८८ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १२ हजार ७२५ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी १२ हजार २५१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ३२२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.