बुलडाणा जिल्ह्यात आणखी ५७ काेराेना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 11:25 AM2021-02-04T11:25:03+5:302021-02-04T11:25:59+5:30
CoronaVirus News जिल्ह्यात आणखी ५७ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात आणखी ५७ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ६१२ काेराेना अहवाल निगेटिव्ह असून ५७ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६६९ अहवाल प्राप्त झाले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये चिखली तालुका अमडापूर १, काठोडा १, वैरागड १, सावरगाव डुकरे १, चिखली शहर ६, बुलडाणा शहर १३, बुलडाणा तालुका सुंदरखेड १, धामणदरी १, मौंढाळा १, चांडोळ १, कुंबेफळ ७, शेगाव तालुका पळशी १, शेगाव शहर ४, मलकापूर तालुका उमाळी २, खामगाव शहर १२, दे. राजा शहर ४, खामगाव तालुका पिं. राजा येथील दाेघांचा समावेश आहे.
काेराेनावर मात केल्याने खामगाव येथील काेविड सेंटरमधून ३१ , चिखली ५, दे. राजा १, बुलडाणा स्त्री रुग्णालय १०, अपंग विद्यालय १, मलकापूर ३, लोणार २, दे. राजा येथील चार जणांना सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत १ लाख १० हजार ८१६ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच ७५३ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १४ हजार ११३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी १३ हजार ६११ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३३२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १७० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
गत काही दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यातच अनेक जण मास्क न लावता फिरत आहेत. तसेच फिजिकल डिस्टन्सींगचा फज्जा उडत आहे.