बुलडाणा जिल्ह्यात आणखी ६३ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 07:20 PM2020-08-31T19:20:16+5:302020-08-31T19:20:22+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार १३४ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतच असून ३१ आॅगस्ट रोजी आणखी ६३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच ४८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. २३१ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार १३४ वर पोहचली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २९४ अहवाल सोमवारी प्राप्त झाले आहेत.
पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४५ व रॅपिड टेस्टमधील १८ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून १६२ तर रॅपिड टेस्टमधील ६९ अहवालांचा समावेश आहे.
पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये खामगांव शहरतील दोन , दाल फैल एक ,सिंधी कॉलनी चार, कॉटन मार्केट रोड एक, सती फैल एक, खामगांव तालुका घाटपुरी एक, लोणी गुरव एक नांदुरा तालुका तालुक्यातील नायगांव चार, चिखली शहरातील दोन , चिखली तालुक्यातील आंधई चांधई एक, मोहाडी एक, शेलगांव जहागीर एक, जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव एक, लोणार शहर दोन, सुलतानपूर तालुका लोणार दोन, शेगांव शहरातील मटकरी गल्ली एक, रोकडीया नगर एक, चंदूबाई प्लॉट एक, जगदंबा नगर एक, राधाकृष्ण मॉल एक, शेगांव तालुक्यातील कालखेड दोन, बुलडाणा शहर पाच , जिल्हा रूग्णालय दोन, शिवाजी नगर एक, बुलडाणा तालुका धाड एक, सागवन सात, मलकापूर शहरातील सराफा बाजार दोन, उपजिल्हा रूग्णालय एक, यशोधाम दोन, गौरक्षण प्लॉट एक, पारपेठ दोन, मलकापूर तालुका अनुराबाद एक ,सिं. राजा तालुक्यतील दे. कोळ येथील एक, साखरखेर्डा येथील एक, मेहकर शहरातील दोन , मेहकर तालुक्यातील उटी येथील एक, सिं. राजा शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे.