जिल्ह्यात आणखी ८६१ पाॅझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:32 AM2021-03-24T04:32:15+5:302021-03-24T04:32:15+5:30

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४ हजार ६४४ अहवाल प्राप्त झाले आहेत. ...

Another 861 positives in the district | जिल्ह्यात आणखी ८६१ पाॅझिटीव्ह

जिल्ह्यात आणखी ८६१ पाॅझिटीव्ह

Next

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४ हजार ६४४ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३ हजार ७३६ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ८६१ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहर व तालुका ९४, खामगांव शहर व तालुका ९८, शेगांव शहर व तालुका १००, दे. राजा तालुका व शहर १२२, चिखली शहर व तालुका ९६, मेहकर शहर व तालुका ५७, मलकापूर शहर व तालुका ४३, नांदुरा शहर व तालुका २८, लोणार शहर व तालुका २६, मोताळा शहर व तालुका ३०, जळगांव जामोद शहर व तालुका ५७, सिं. राजा शहर व तालुका ५७ आणि संग्रामपूर शहर व तालुका ५३ रुग्णांचा समावेश आहे.

तसेच विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून ५२९ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत १ लाख ८९ हजार २६ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत २५ हजार ५३७ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण ३१ हजार ४७४ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी २५ हजसा ५३७ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ५ हजार ६९७ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २४० कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

Web Title: Another 861 positives in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.