बुलडाणा जिल्ह्यात आणखी ९८ पॉझिटिव्ह, ४९ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:28 PM2020-10-28T12:28:47+5:302020-10-28T12:28:56+5:30

Buldhana corona Update कोरोना बाधितांची संख्या ९१५३ झाली असून कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या ८४१८ झाली आहे.

Another 98 positives in Buldana district, 49 beat Corona | बुलडाणा जिल्ह्यात आणखी ९८ पॉझिटिव्ह, ४९ जणांची कोरोनावर मात

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ९८ पॉझिटिव्ह, ४९ जणांची कोरोनावर मात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा: जिल्ह्यात मंगळवारी ९८ जण कोरोना बाधीत आढळून आले तर ४९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना  रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ९१५३ झाली असून कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या ८४१८ झाली आहे.
मंगळवारी प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रॅपीड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्यांपैकी ८१७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७१९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
 यामध्ये पहुरजिरा येथील एक, गौलखेड एक, शेगाव दोन, जळगाव जामोद एक, भोटा २२, मलकापूर सात, चिखली १३, रायपूर दोन, देऊळगाव घुबे पाच, गुंजाळा एक, जागदरी एक, अंत्री एक, बोराखेडी एक, तांदुळगाव एक, हिवरा आश्रम दोन, देऊळगाव माळी एक, मोळा चार, शेंदला एक, मेहकर दहा, बुलडाणा दोन, येळगाव एक, शेंदुर्जन एक, साखरखेर्डा एक, धानोरी एक, दुसरबीड एक, खामगाव दोन, पारखेड दोन, वझर एक, लोणार दोन, खळेगाव एक, सायखेड एक या प्रमाणे ९८ जण कोरोना बाधीत आढळून आले.
दरम्यान, ४९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये देऊळगाव राजा कोवीड सेंटरमधून चार, नांदुरा आठ, मेहकर सहा, शेगाव दोन, चिखली ११, खामगाव दहा, बुलडाणा आठ या प्रमाणे ४९ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

Web Title: Another 98 positives in Buldana district, 49 beat Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.